बीड : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आरोपी लव उर्फ राहूल चांदणे यास विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश एम.व्ही. मोराळे यांनी 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड.मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले.
बीड येथे राहणार्या एका अल्पवयीन मुलीवर बीड येथेच राहणारा लव उर्फ राहूल चांदणे याने बलात्कार केला होता. यातून पीडित मुलगी गरोदर राहिली, व तिने एका मुलास जन्मही दिला होता. या घटनेमुळे अल्पवयीन मुलीने पेठ बीड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यावेळी आरोपी राहुल चांदणे याच्याविरुध्द पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपनिरीक्षक बनकर यांनी प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
यात सरकार पक्षातर्फे एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारे व सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी लव उर्फ राहुल चांदणे यास कलम 376(2) व कलम 4 पोक्सो अंतर्गत दोषी धरून त्यास कलम 4 पोकसो कायद्याअंतर्गत 20 वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा तसेच कलम 506(2) भादंविमध्ये सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे.