सोलापूर : सोलापूरातील प्रसिध्द हॉटेल व्यावसायिक प्रभाकर काशप्पा गौडनवरु (वय ४४) यांच आज पुण्यात खाजगी रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी होटगी रोडवरील जैनापूर शिरवळ फाट्याजवळील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार झाले.
तीन दिवसापूर्वी त्यांना ब्रेनस्ट्रोकचा त्रास झाला. यानंतर सोलापुरातून पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. त्यांची प्रकृती अधिक खालावली. आज सकाळी उपचार सुरु असताना निधन झालं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ही माहिती निकटवर्तीयांनी दिली. त्यांचा पार्थिव पुण्याहून सोलापुरात आणले. सायंकाळी शिरवळ फाट्याजवळील शेतात पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
प्रभाकर गौडनवरु हे गेली २० वर्ष हॉटेल व्यावसायात कार्यरत होते. जय पॅलेस तसेच यश पॅलेस ही त्यांची प्रसिध्द हॉटेल याचबरोबर सोशल क्लब संघटनांच्या माध्यमातूनही जनसंपर्क होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिणी, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.