अहमदाबाद : इंग्लंडविरुद्धचा चौथा टी-20 सामना भारताने 8 धावांनी जिंकला आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 185 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 20 षटकात 177 धावाच करु शकला. भारताकडून सुर्यकुमार यादवने सर्वाधिक 57 धावा केल्या. तर इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक 46 धावा केल्या. तसेच, भारताकडून हार्दीक पांड्याने 16 धावांत 2 गडी बाद केले. 5 सामन्यांची मालिका आता 2-2 अशी बरोबरीत आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील टी 20 मालिकेत टीम इंडियानं पुनरागमन केलं आहे. गुरुवारी झालेल्या चौथ्या मॅचमध्ये भारताने इंग्लंडचा 8 रननं पराभव केला. शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगतदार झालेली ही मॅच भारताने जिंकली आणि मालिकेत बरोबरी साधली. भारताचा विजय हा मुंबई इंडियन्ससाठी देखील एक गुड न्यूज आहे. या मॅचमध्ये खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक खेळाडूनं सरस कामगिरी करत भारतीय टीमच्या विजयात हातभार लावला आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पार पडलेला चौथा टी20 सामना भारताने 8 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. भारताचा धाकड फलंदाज सूर्यकुमार यादव या अटीतटीच्या सामन्याचा नायक ठरला. मात्र त्याच्या झंझावती खेळीला अनपेक्षित ब्रेक लागल्याने वाद निर्माण झाला आहे. पंचांच्या सॉफ्ट सिग्नलमुळे या वादाला तोंड फुटले आहे. यामुळे पंचांनी दिलेला सॉफ्ट सिग्नल म्हणजे नक्की काय? याचे नियम काय आहेत? असे प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सूर्यकुमार यादवचं अर्धशतक हे भारताच्या बॅटींगचं मुख्य वैशिष्ट्य ठरलं. सूर्यकुमारनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच बॅटींग करताना 28 बॉलमध्येच अर्धशतक झळकावले. रोहित, राहुल आणि विराट हे प्रमुख बॅट्समन मोठी धावसंख्या करण्यात अपयशी ठरले. त्या परिस्थितीमध्ये सूर्यकुमारनं भारताची इनिंग सावरली. त्याने आक्रमक खेळ करत रनरेट कुठेही कमी होणार नाही याची काळजी घेतली.
गुरुवारच्या मॅचच्या शेवटच्या टप्प्यात रोहित शर्मानं कॅप्टनसी केली. नियमित कॅप्टन मैदानात नसल्याचा कोणताही परिणाम भारताच्या फिल्डिंगवर झाला नाही. त्याने बॉलर्स उत्तम हातळले. शेवटच्या ओव्हरमध्ये दबावात असलेल्या शार्दुल ठाकूरला मार्गदर्शन केले. भारताच्या विजयात रोहितच्या शांत कॅप्टनसीचे मोठे योगदान होते.
चौथ्या टी20 मध्ये दोन्ही टीमनं मिळून 350 पेक्षा जास्त रन झाले. बॅटींगला अनुकूल अशा पिचवर हार्दिक पांड्यानं (Hardik Pandya) 4 ओव्हरमध्ये फक्त 16 रन देत 2 विकेट्स घेतल्या. हार्दिक पांड्याचा फिटनेस हा गेल्या वर्षभरापासून काळजीचा विषय होता. त्यामुळे तो बॉलिंगपासून दूर होता. या मालिकेत हार्दिक सातत्याने बॉलिंग करत आहे. त्याचा भारतीय टीमला फायदा होतोय. तसंच तो या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला देखील होणार आहे.
सूर्यकुमार, रोहित, हार्दिक आणि राहुल हे चार मुंबई इंडियन्सचे खेळाडू अंतिम 11 मध्ये खेळले. या चौघांनीही भारताच्या विजयात हातभार लावत फॉर्ममध्ये असल्याचे दाखवून दिले आहे. इशान किशननंही या मालिकेत एक अर्धशतक झळकावलं आहे. अहमदाबादच्या नरेद्र मोदी स्टेडियममध्ये या सर्वांना गवसलेला सुर हा आगामी आयपीएलचा विचार करता मुंबई इंडियन्ससाठी ही खुशखबर आहे.
* पदार्पणाच्या सामन्यातच ‘सुर्या’ तळपला, आर्चरला षटकार ठोकत करिअरची सुरुवात
भारत-इंग्लंड मालिकेतील चौथा टी-20 सामना आज खेळला जात आहे. सामन्यात भारताच्या सुर्यकुमार यादवनं पदार्पणाच्या सामन्यातच अर्धशतक केलं आहे. त्याने 31 चेंडूत 57 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार व 3 षटकार ठोकले. विशेष म्हणजे त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात षटकार ठोकत केली. त्याने पहिल्याच चेंडूवर जोफ्रा आर्चरला गगनचुंबी षटकार ठोकला. मालिकेतील आव्हान टिकवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे.