मालेगाव : मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण घेणे सुरु असतांना मुस्लिम समाजात अजूनही गैरसमज दिसून येतात. लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही याची लेखी हमी द्या, तरच लस घेऊ, अशी अजब मागणी नाशिकच्या मुस्लिमबहुल मालेगाव शहरात केली जातेय. लस घेणाऱ्या मुस्लिमांची संख्या दोन आकडी देखील नाही. त्यामुळे येथील कोरोना नियंत्रणात आणणे प्रशासनापुढे आव्हान ठरणार आहे. दरम्यान, मालेगावात पोलिओचे 100% लसीकरण कधीच पूर्ण झालेले नाही.
कोरोना लसीकरणाची धूम सुरू असतानाच लसीसंदर्भात येथील मुस्लिम समाजात अजूनही मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. ‘लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही याची लेखी हमी द्या, तरच लस घेऊ’ अशी अजब मागणी मालेगाव येथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडे केली जात आहे.
महापालिका हद्दीतील आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांचे लसीकरणाचे प्रत्येकी दोन डोस पूर्ण होत आले आहेत. 45 वर्षांवरील गंभीर आजारी रुग्णांनाही तातडीने लस दिली जात आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मुस्लिमबहुल भागात लसीकरणाबाबत प्रबोधन व जनजागृती केली जात आहे. या भागातील ज्येष्ठांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे वरिष्ठांना कळविले असल्याचे आरोग्यधिकारी डॉ. सपना ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
जिल्ह्यासह देशभरात कोरोना लसीकरणाची धूम सुरू असतानाच लसीसंदर्भात मालेगाव येथील मुस्लिम समाजात अजूनही मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. ‘लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही याची लेखी हमी द्या, तरच लस घेऊ’ अशी अजब मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडे केली जात आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मालेगाव शहरात 17 दिवसांत दोन हजार 451 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले. यात मुस्लिम समाजातील ज्येष्ठांची संख्या दोन आकडी देखील नाही. आरोग्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना या अजब मागणीसह मुस्लिम बांधव लसीकरणास नकार देत असल्याचे कळविले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मालेगावला कवेत घेण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या सुरुवातीला गेल्या वर्षी एप्रिल ते जून या काळात शहरातील मुस्लिमबहुल पश्चिम भागातील रुग्णसंख्या मोठ्या संख्येने आढळली. यानंतर कोरोनाने आपला मोर्चा कॅम्प- संगमेश्वरच्या पश्चिम भागाकडे वळविला. जून 2020 ते आजतागायत या भागात रोज शेकडो रुग्ण आढळत आहेत. मध्यंतरीच्या सहा महिन्यांत पूर्व भागातून कोरोना हद्दपार झाला होता. मात्र, अलीकडे या भागातून कमी प्रमाणात का होईना रुग्ण आढळत आहेत.
1 मार्चपासून जिल्ह्यात ज्येष्ठांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. 70 टक्के लोकसंख्या असलेल्या पूर्व भागातून लसीकरण मोहिमेला ज्येष्ठांनी सुरुवातीच्या 17 दिवसांत तरी धुडकावून लावले आहे. कोरोना व लसीसंदर्भात येथे अजूनही मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. ‘लसीचा काहीही फायदा होत नाही. लस घेतल्यावर कोरोना होणार नाही, असे लिहून दिले, तर आम्ही घेऊ,’ असे खडे बोल येथील नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना सुनावले जात आहेत.