नवी दिल्ली : ‘फाटलेल्या जीन्स घालून महिला मुलांना काय संस्कार देणार?’, असं उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीर्थसिंह रावत यांनी म्हटलं होतं. याला काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी एक ट्विट करत उत्तर दिलं. त्यांनी आरएसएसचा खाक्या रंगाचा गणवेश घातलेला पंतप्रधान मोदी, मोहन भागवत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे काही जुने फोटो शेअर केले. त्याला ‘अरे देवा, यांचे तर उघडे गुडघे दिसत आहेत’ असं कॅप्शन दिलं.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेले भाजपचे वरिष्ठ नेते तीरथ सिंह रावत यांनी काही दिवसांपूर्वी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर त्यांनी महिलांवर केलेल्या अक्षेपार्ह वक्तव्यामुळे ते चर्चेत राहिले होते. त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली.
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदींचा हाफ चड्डीवरचा फोटो शेअर करत, रावत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. प्रियंका गांधी यांनी त्यांच्या ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि केद्रिंय मंत्री नितीन गडकरी यांचे आरएसएसच्या हाफ चड्डीतला फोटो शेअर केला आहेत. ‘अरे देवा… यांचे तर गुडघे दिसत आहे की…’ असं कॅप्शन त्यांनी यावर दिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
Oh my God!!! Their knees are showing 😱😱😱 #RippedJeansTwitter pic.twitter.com/wWqDuccZkq
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) March 18, 2021
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी महिलांच्या फाटक्या जीन्सबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर देशात एकाच खळबळ उडाली आहे. रावत यांच्या वक्तव्यावरुन सोशल नेटवर्कींगवरुन त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच आता या वादात काँग्रेसच्या सचिव प्रियंका गांधी यांनींही उडी घेतली आहे. प्रियंका गांधींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो पोस्ट केला आहे. मात्र हे करत असताना त्यांनी नेत्यांचे गुडघे दिसत आहेत असे म्हणत रावत यांच्यावर खोचक टीका केली आहे.
या फोटोमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सरसंघचालक मोहन भागवत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जुन्या फोटोंचं कोलाज आहे. या फोटोंमध्ये हे सर्व वरिष्ठ नेते संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसत असून त्यांनी संघाचा पोशाख म्हणजेच अर्ध्या बाह्यांचा पांढरा शर्ट आणि हाफ पॅण्ट घातलेली दिसत आहे. रावत यांनी गुडघे दिसणाऱ्या महिलांसंदर्भात वक्तव्य केल्याने त्याचा आधार घेत प्रियंका यांनी या वरिष्ठ नेत्यांचेही गुडघे दिसत होते असा टोला लगावला आहे.
* मुख्यमंत्री रावत यांनी काय म्हटले होते ?
दरम्यान, एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री रावत यांनी महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केले होते. ‘आजकाल महिला फाटलेल्या जीन्स घालून फिरतात, हे सगळं बरोबर आहे का? हे कसले संस्कार आहेत,’ असं रावत यांनी म्हटलं आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या वतीने कार्यशाळेचं आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी जीन्ससंदर्भात हे वक्तव्य केले होते. मुलांवर होणाऱ्या संस्कारला पालक जबाबदार असतात, असेही ते म्हणाले.