नागपूर : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली आहे. काल (19 मार्च) दिवसभरात नागपुरात 3235 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 35 रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये धडकी भरली आहे. या वर्षातील मृत्यूचा हा उच्चांक आहे. सध्या नागपुरात 25 हजार 569 एवढे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच, कोरोनातून बरे होणाऱ्यांची टक्केवारी ही 83.78 एवढी आहे.
* कोरोना – नागपुरात परिस्थिती बिघडली, 35 जणांचा मृत्यू
19 मार्च – नागपूरमध्ये लॉकडाऊन लागू असतानाही कोरोनाचे संकट वाढत आहे. परिस्थिती आणखी चिंताजनक होत आहे. धक्कादायक म्हणजे आज एकाच दिवसात नागपूर जिल्ह्यात 35 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर तब्बल 3235 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होताना सध्या दिसून येत आहे. तसेच अनेक ठिकाणी गर्दीही होत असल्याचे वृत्त आहे.
* कोरोनाचे 25,681 नवे रुग्ण; 70 जणांचा मृत्यू
महाराष्ट्रात कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती झाली आहे. राज्यात शुक्रवारी 24 तासात कोरोनाचे 25,681 नवे रुग्ण आढळले आहेत. 14,400 जण बरे झाले आहेत. तर 70 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंतचे एकुण रुग्ण 24,22,021. एकुण बरे झालेले रुग्ण 21,89,965. एकुण मृत्यू 53,208 इतके झाले तर अॅक्टिव्ह केसेस 1,77,560 इतके आहेत.