मुंबई : भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकर लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. ज्वाला दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशालसोबत लग्न करणार आहे. ‘अरण्य’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात विष्णू विशाल याने याची माहिती दिली. दरम्यान, 2005 साली ज्वाला गुट्टा हिने बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी लग्न केले होते. परंतू 2011 मध्ये ते एकमेकांपासून विभक्त झाले.
बॉलीवूडमधल्या सेलिब्रेटींच्या नावाची जेवढी चर्चा होते तितक्या प्रमाणात एखाद्या खेळाडूच्या लग्नाची होत नसल्याची चाहत्यांची नेहमीची ओरड असते. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचे लग्न झाले. त्याला मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या. त्याच्या भावी आयुष्यासाठी सुयश चिंतले. आता अशाच एका भारतीय खेळाडूची गोड बातमी पुढे आली आहे. ती खेळाडू कोण हे जाणून घेऊया.
तुम्हाला बॅटमिंटन विश्वातील ती खेळाडू माहिती असेल, त्याचं काय आहे की, गेल्या वर्षी सात सप्टेंबरला ज्वाला गुट्टा आणि विष्णु विशाल यांनी एक गोड बातमी दिली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यात आम्ही आता लवकरात लवकर लग्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यावेळी त्या दोघांच्या फॅन्सनं त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव केला होता. त्यांना मोठ्या प्रमाणावर शुभेच्छाही दिल्या होत्या. याबाबत अधिक माहिती देताना विष्णु यांनी सांगितले की, आम्ही आता लवकरच लग्नाच्या बंधनात अडकणार आहोत.
N dis happened last nite n what a beautiful surprise it was!
Today when I think of my life what a journey it has been n 2day I realise there is so much more to luk forward to!Towards our family,Aryan,friends and work!its gonna be another great journey am sure ❤️🥂😘 pic.twitter.com/qjqVkK6CWo— Gutta Jwala 💙 (@Guttajwala) September 7, 2020
मी आता खुपच आनंदित आहे. लग्नाची तारीखही जाहीर करणार आहोत. मी जेव्हा अरण्याची शुटिंग करत होतो तेव्हा ज्वाला ही नेहमीच माझ्यासोबत होती. आम्हाला साथ देणा-या सर्वांचे मनापासून आभारही विष्णुनं यावेळी मानले आहेत.
* चेतन आनंदशी पहिला विवाह
2005 साली ज्वाला गुट्टा हिने बॅडमिंटनपटू चेतन आनंदशी लग्न केले होते. मात्र, दोघांमधील वादामुळे या नात्याला घरघर लागली. आणि त्यांनी त्यापासून फारकत घेतली. ज्वाला आणि चेतन आनंद 2011 मध्ये एकमेकांपासून वेगळे झाले. विष्णू विशाल घटस्फोटित आहे.
2011मध्ये त्याने रजनी नटराजनशी लग्न केले होते, परंतु 2018 पासून ते वेगळे राहत आहेत. विष्णू विशाल हा तामिळ अभिनेता आणि निर्माता आहे. त्याचा ‘अरण्य’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. येत्या 26 तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होईल.