नवी दिल्ली : ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या घोषणेला नॅशनल मीडिया सेंटरमध्ये नुकतीच सुरूवात झाली आहे. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा शेवटचा सिनेमागृहात रिलीज झालेला चित्रपट ‘छिछोरे’ला मिळाला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात कंगना सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री ठरली आहे.
६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा चित्रपट छिछोरेला मिळाला आहे. ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. २०१९ मध्ये बनलेल्या चित्रपटांसाठी ही घोषणा करण्यात आली आहे
यात कंगना रनौतला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर मनोज वाजपेयीला (भोसले) आणि धनुषला (असूरन) चित्रपटासाठी विभागून सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तसेच, दिवंगत सुशांतसिंह राजपुतचा छिछोरे हा सर्वोत्कृष्ठ हिंदी चित्रपट ठरला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर नॉन फिचर फिल्म विभागात हिंदी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार ‘एन इंजीनियर्ड ड्रीम’ला मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हेमंत गाबाने केले आहे. स्पेशल मेंशन पुरस्कारात चार चित्रपट बिरियानी, जोना की पोरबा (आसमिया), लता भगवान करे (मराठी)आणि पिकासो (मराठी) ला मिळाला आहे.
यावर्षीच्या राष्ट्रीय पुरस्कारांसाठी फिचर फिल्म विभागासाठी एकूण ४६१ चित्रपटांचा समावेश होता. २०१९ मधील मोस्ट फिल्म फ्रेंडली स्टेट विभागात तेरा राज्यांनी सहभाग घेतला होता. त्यातून हा पुरस्कार सिक्किमला जाहीर करण्यात आला आहे.
२०२० वर्षे कोरोना व्हायरसच्या महारोगराईच्या संकटात गेले आणि त्यामुळे आज २०१९ साली बनलेल्या चित्रपटांचे पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे. कोरोनामुळे मागील वर्षी राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली नव्हती. जी ३ मे, २०२० रोजी पार पडणार होती. त्यामुळे यंदा २०१९ सालातील पुरस्कार जाहीर करण्यात येणार आहे.
* चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी
– सर्वोत्कृष्ठ चित्रपटस्नेही राज्य- सिक्कीम
– बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह – जक्कल
– सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स
– सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) – मनोज बाजपेयी (भोसले), धनुष (असूरन)
– सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणौत (पंगा, मणिकर्णिका)
– सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे
– सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती) – सोहिनी चट्टोपाध्याय.
* राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्यांची यादी
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा झाली आहे. 2019 मध्ये बनलेल्या चित्रपटांसाठी ही घोषणा करण्यात आली आहे.
– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)
– सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- सावनी रविंद्र (रान पेटलं – Bardo )
– सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)