सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढत आहे. यमुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज गुरुवारी सुधारित आदेश काढले आहेत. सोलापूर पोलीस आयुक्तालयाची हद्द वगळून ग्रामीण भागासाठी हा आदेश काढला आहे.
या आदेशातून अत्यावश्यक सेवा आणि मनुष्य व प्राणी मात्रासाठी जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला व फळे, किराणा दूध व वृत्तपत्र वितरण या बाबींना या आदेशातून सुट देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या या सुधारित आदेशानुसार आता जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी सात ते रात्री सात या वेळेत चालू राहणार आहे. होळी, रंगपंचमी, धुलवड सणाला प्रशासनाने चाप लावला आहे. कोरोनाचे सुधारित आदेश जारी केले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील सर्व आठवडे व बाजार जनावरांचा बाजार बंद करण्यात आले आहेत. खाद्यगृह, परमिट रूम व बार फक्त सकाळी सात ते रात्री आठ या कालावधीत कोव्हिडच्या नियमांचे पालन करून ५० टक्केच्या क्षमतेने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
होम डिलिव्हरीसाठी किचन व वितरण कक्ष रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जिम, व्यायाम शाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, खेळाची मैदाने, जलतरण तलाव हे वैयक्तिक सरावासाठी सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारची धार्मिक स्थळेही सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरू राहतील. धार्मिक विधीमध्ये पाचपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहता येणार नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी त्यांच्याकडे लिलावासाठी येणाऱ्या कृषी मालाच्या प्रकारानुसार नियोजन करावे. एका दिवशी, एकाच वेळी लिलाव न करता शेत मालाच्या प्रकारानुसार लिलावाचा दिवस व वेळ विभागून द्यावी अशी सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केली आहे. बाजार समित्यांमधील लिलावाच्या नियोजनाची जबाबदारी जिल्हा उपनिबंधकांवर सोपविण्यात आली आहे.
* असा आहे आदेश, ३१ मार्चपर्यंत लागू
– प्रत्येक शनिवार आणि रविवार सर्व दुकान बंद
– दररोज सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंतच दुकान सुरु राहतील
– सोलापूर शहरात हा आदेश उद्या पासून लागू
– होळी, रंगपंचमी, धुलवड. सार्वजनिक स्वरुपात करता येणार नाही..
– सोलापूर शहरात संचार बंदीचा कालावधी आहे तोच म्हणजे रात्री ११ ते पहाटे ५पर्यंत राहील
– सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर ग्रामीण हद्दीत आज पासून नवीन आदेश काढले आहेत..
– यानुसार अत्यावश्यक सेवा वगळता ग्रामीण भागातील दुकान आता सकाळी ७ ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहतील. शनिवार-रविवारी दुकान पूर्णपणे बंद राहतील. हॉटेल ,बार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत सुरू राहतील.
हॉटेलला रात्री दहा वाजेपर्यंत होम डिलिव्हरी करता येईल. आठवडी बाजार पूर्णपणे बंद राहतील .