मुंबई : जगभरात कोविड-१९ या महामारीने थैमान घातले आहे. अगदी सामान्य व्यक्तींपासून ते मोठ्या सेलिब्रेटींपर्यंत अनेकांना या व्हायरसचे संक्रमण झाले आहे. नुकताच माजी भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. याबद्दलची माहिती मास्टर ब्लास्टर तेंडूलकरने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 27, 2021
“मला कोरोनाची बाधा झाली आहे. मी सांगितलेल्या सर्व खबरदारी घेत आहे. माझी आज चाचणी झाली व त्यात माझे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत. मला कोरोनाची सौम्य लक्षण दिसत आहेत. माझ्या घरच्यांचे रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. मी घरातच स्वत:ला क्वारंटाईन करुन घेतले आहे. व डॉक्टरांनी सांगितलेली सर्व काळजी घेत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मला व देशातील इतरांना मदत करणाऱ्या सर्व मेडिकल स्टाफचे मी मनापासून आभार मानत आहे. सर्वांनी काळजी घ्या,” असे सचिन आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
गेल्या आठवड्यात अर्थात २१ मार्च रोजी सचिन रोड सेफ्टी सिरीजच्या अंतिम सामन्यात खेळला होता. या सामन्यात सचिनने इंडिया लिजंड्सचे नेतृत्त्व करताना श्रीलंकेवर विजय मिळत चषकावर नाव कोरले होते. त्यानंतर तो रायपुरहून मुंबईला परतला होता.
२०१३ साली क्रिकेटला अलविदा केलेल्या सचिनने भारताकडून २०० कसोटी, ४६३ वनडे व एक कसोटी सामना खेळला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर तब्बल १०० शतकं असून सर्वाधिक धावांचा विक्रमही त्याच्याच नावावर आहे. सचिनने वनडे व कसोटीत अनुक्रमे १८४२६ व १५९२१ धावा केल्या आहेत. सचिनला सर डॉन ब्रॅडमन यांच्यानंतरचा सर्वात महान फलंदाज समजले जाते.