मुंबई : आपल्यावरील आरोपांची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. माझ्यावर मुंबई चे पोलीस आयुक्त यांनी जे आरोप केले आहेत, त्याची चौकशी करावी अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांना केली होती. मुख्यमंत्र्यांनी ती मान्य केली आहे. तसेच, जे काही सत्य आहे ते जनतेसमोर येईल, असेही ते म्हणाले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांप्रकरणी चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्रात १०० कोटींच्या खंडणी वसुलीचे आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केले आहेत. यावर चौकशी व्हावी अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. आता यासंदर्भात अनिल देशमुख यांनी माहिती दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आपल्या मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांनी जे आरोप केले होते त्या प्रकरणी आपण मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. या प्रकरणी हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांद्वारे चौकशी करण्यात येणार आहे, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.
* पोलिसात अमर्यादित अधिकार कोणी दिले?
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ‘सामना’मधील रोखठोक सदरातून अनिल देशामुखांना कानपिचक्या दिल्या आहेत. पोलीस अधिकारी सचिन वाझे हा खंडणी वसुली करत होता आणि गृहमंत्री अनिल देशमुखांना याची काहीच माहिती नव्हती? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला आहे. पोलीस आयुक्त, गृहमंत्री, मंत्रिमंडळातील प्रमुख व्यक्तींचा लाडका आणि विश्वासपात्र ठरलेला वाझे हा एक फक्त सहायक पोलीस निरीक्षक होता. त्याला मुंबई पोलिसात अमर्यादित अधिकार कोणी दिले? असा सवालही देशमुखांना केला होता.