सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्षपदी आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवडीबद्दल सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले, युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व आगामी महापालिका निवडणूक संदर्भात युवक काँग्रेसची महत्वाची बैठक आज काँग्रेस भवन सोलापूर येथे झाली.
यावेळी नूतन पदाधिकारी सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष पदी मनोज यलगुलवार, व इतर इरफान बागवान, राजू सकी, रोहन साठे, रमेश पारशेट्टी, प्रतीक आबूटे, नागनाथ समाने, नीलेश व्होटकर, सुनील बोलेदुलु, गणेश वाघमारे, श्रीकांत कुसुरकर, पवन पुल्ली, नरेश बोल्लु, नरेश येलूर, सिद्राम लिम्बोळे, विजय कोंतम, श्रीकांत दुडेली, नरेश महेश्वरम, मल्लेश कंपली, सिद्राम म्हेत्रे यांचे निवडीचे पत्र आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी सोलापूर शहर काँग्रेस अध्यक्ष प्रकाश वाले, सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, सोलापूर शहर काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस विनोद भोसले, एनएसयूआयचे जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, दक्षिण सोलापूर विधानसभा अध्यक्ष सैफन शेख, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कन्ना, कार्याध्यक्ष युवराज जाधव, राहुल वर्धा, प्रदेश युवक प्रवक्ता मनोज कुलकर्णी, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे, प्रवीण जाधव, गोविंद कांबळे, अनंत म्हेत्रे, महेश जोकारे, धनराज गायकवाड़, महेश लोंढे, बाबूराव क्षीरसागर, बबलू बागवान, शरद गुमटे, भगवान करगुळे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यावेळी बोलताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे म्हणाले की, सोलापूर शहरातील ज्या युवकांना स्वतः उभे रहायचे आहे, स्वतःचा व्यवसाय करायचे आहे त्यांना स्वयंरोजगारासाठी सहकार्य करू, त्यासाठी हक्काने आमच्याकडे या, नाराज होऊ नका तुम्ही आहात म्हणून आम्ही आहे. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. सोलापूर महापालिकेत भाजप सत्तेवर असुन त्यांचा पाणी, रस्ते, धूळीचे साम्राज्य पाण्याचा नावाने बोम्ब, नगरसेवकांना विकास निधी नाही, असे भोंगळ कारभार चालू असल्याची टीका केली.
* मी कधीही जातीचा वापर केला नाही
ज्यांना आगामी महापालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवायची आहे, त्यांनी आतापासून कामाला लागावे. आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना उमेदवारी देणार आहे. निवडणुकीत जातपात चालत नाही. कामच सर्वात श्रेष्ठ असते. त्यामुळेच लोकांनी मला साथ दिली. मी कधीही जातीचा वापर केला नाही, ते शिंदे साहेब व माझ्या तत्वात बसत नाही. जातीपातीच्या विरोधात मी उभी राहिले आणि लोकांनी मला साथ दिली केवळ कामामुळेच, हिच लोकशाहीची ताकद आहे. कामाला तोड नाही म्हणून आजपासून कामाला लागा काँग्रेस पक्ष लोकामध्ये जाऊन काम करणाऱ्यांवर विश्वास ठेवते. सर्वसामान्य जनता, काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या जोरावर सोलापूर महापालिकेवर तिरंगा फडकविणार आहे. येत्या काही दिवसात काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार असल्याचे आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.