मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवरून सुरू झालेल्या तर्कवितर्काच्या धुळवडीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राजकीय पिचकारीतून शरसंधान साधलं आहे.पवार-शहा यांची गुप्त भेट झालीच नसल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते अमित शहा यांच्यात भेट झाली तर त्यात चूकीचे काय? असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटले आहे. कामानिमित्त दोन नेत्यांची भेट झाली असेल तर होऊ द्या. या भेटीत सस्पेन्स असं काय आहे. दोन नेत्यांनी भेटणं वावगं काय? गृहमंत्र्यांकडे पवारांचे काही काम असू शकते, असेही संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यानंतर त्यांनी भेटच झाली नसल्याचे सांगत अफवा थांबवा म्हटले.
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात झालेल्या गृप्त भेटीची सर्वत्र चर्चा सुरु आहे. यावरुन राज्यातलं राजकारण सध्या चांगलंच तापलं आहे. यासंदर्भात आज पुण्यात बोलताना भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्रवादीसोबत जाणार का? या प्रश्नावर चंद्रकात पाटील यांनी म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा जो निर्णय घेतील तो मान्य असेल. वरिष्ठ याबाबत जो निर्णय घेतील तो मान्य असेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
* राजकीय पिचकारीतून शरसंधान
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीवरून सुरू झालेल्या तर्कवितर्काच्या धुळवडीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राजकीय पिचकारीतून शरसंधान साधलं आहे.पवार-शहा यांची गुप्त भेट झालीच नाही. त्यामुळे अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असं खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही .
आता तरी रहस्य कथेचा शेवट करा.अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही. pic.twitter.com/hV52BUYO8Q— Sanjay Raut (@rautsanjay61) March 29, 2021
शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विट करून ही हे आवाहन केलं आहे. मी ठामपणे सांगतो अशी काही गुप्त भेट वगैरे अजीबात झालेली नाही. आता तरी रहस्य कथेचा शेवट करा. अफवांची धुळवड थांबवा. हाती काहीच लागणार नाही, असं राऊत यांनी म्हटलं आहे.