मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन लागण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तसा इशाराही दिला आहे. त्यामुळे राज्यात 15 दिवसांचा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. त्यातच आता बुधवारी (ता. 31) मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊनसंदर्भात अंतिम निर्णय होईल, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. कारण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाऊनची तयारी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही 2 एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊन जाहीर करण्यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह 1 एप्रिलनंतर बैठक होणार असल्याचं म्हटलं आहे.