नवी दिल्ली / मुंबई : देशात कोरोना रुग्ण संख्येचा विस्फोट झाला आहे. गेल्या 24 तासात भारतात तब्बल 68,020 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 32,231 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 291 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सध्या देशात 5,21,808 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत, त्यामुळे काळजी घ्या, सुरक्षित राहा.
महाराष्ट्रात कोरोनाचा हाहाकार पहायला मिळत आहे. काल राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या पहायला मिळाली होती. आज त्यामध्ये काहीशी घट झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या कालच्या संख्येच्या तुलनेत घट झाली असली तरी धोका कायम आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबवण्यात येत आहेत. गेल्या 24 तासात राज्यात 31 हजार 343 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 102 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज राज्यात 20 हजार 854 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
आजपर्यंत 23 लाख 53 हजार 307 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण घटत चालले आहे. सध्या राज्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.71 टक्के आहे. रुग्ण वाढत असताना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. आज राज्यात 102 रुग्णांचा मृत्यू झाला असून आजपर्यंत 54 हजार 283 जणांना जीव गमवावा लागला आहे. राज्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 1.98 टक्के आहे.
सध्या राज्यामध्ये 3 लाख 36 हजार 584 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहेत पुण्यात 59 हजार 475 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1 कोटी 94 लाख 95 हजार 189 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 27 लाख 45 हजार 58 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 14.08 टक्के आहे. सध्या राज्यात 16 लाख 07 हजार 415 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 16 हजार 614 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
* राज्यात सर्वाधिक रुग्ण असलेले शहर
देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात पुण्यात सर्वाधिक 59475, मुंबई 46248, ठाणे 35264, नाशिक 26553, औरंगाबाद 21282, नांदेड 15171, नागपूर 45322, जळगाव 6602, अहमदनगर 7952 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.