पंढरपूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय घडामोडींना अधिकच वेग येत आहे. काल मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एकूण ४२ अर्ज दाखल झाले. आज बुधवारी अर्ज छाननी दरम्यान अपक्ष उमेदवार माऊली हळणवर यांनी भाजपचे उमेदवार समाधान आवताडे व राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेतली. मात्र ही हरकत निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी फेटाळल्याने दोन्ही प्रमुख उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
भाजपचे समाधान आवताडे हे ठेकेदार असून यांच्या कंपनीला माळशिरस तहसिलदारांनी ४४ लाख रुपयांचा दंड झाला आहे. याचबरोबर भगिरथ भालके चेअरमन असलेल्या विठ्ठल कारखान्याने ऊस उत्पादक सभासदांना एफआरपीची रक्कम दिली नसल्याने हरकत घेण्यात आली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, अपक्ष सुदर्शन खंदारे यांनी देखील अशाच प्रकारची हरकत घेतली होती. यावर सुनावणी घेवुन निवडणू निर्णय अधिकारी गजानन गुरव यांनी या हरकती फेटाळल्या.
हायकोर्टात अपील करणार : हळवणकर
दोन उमेदवारांविरोधात हरकती घेण्यात आली होती. ही हरकत फेटाळली असून याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करणार असल्याचे अपक्ष उमेदवार माऊली हळवणकर यांनी सांगितले