सातारा : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर (वय ९२) यांचे बुधवारी वृध्दापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांना एकूण तीन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे. सातारा जिल्ह्यातील पळसावडे (ता. माण) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती संबंधित कुटुंबीयांनी दिली.
गुणाबाई जानकर यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी आहे. गुणाबाईंनी शिक्षण घेतलेले नसले तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांचा संभाळ करून त्यांना उच्चशिक्षित बनवले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी मंत्री महादेव जानकर यांच्या संघर्षाच्या काळात आईने त्यांना साथ दिली. मुलांनी शिक्षण घ्यावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महादेव जानकर हे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या बंगल्याच्या शेजारी निवासस्थानी राहण्याची संधी त्यांना मिळाली, त्यांच्या कष्टाचे चीज झाले, अशीच सर्वांनी भावना त्या वेळी व्यक्त केली होत्या. या त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
महादेव जानकर यांच्या संघर्षाच्या काळात आईने त्यांना साथ दिली.मुलांनी शिक्षण घ्यावे,यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महादेव जानकर हे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्याच्या शेजारी निवासस्थानी राहण्याची संधी त्यांना मिळाली,त्यांच्या कष्टाचे चीज झाले,अशीच सर्वांनी भावना त्या वेळी व्यक्त केली होत्या.