वेळापूर : अकलूज सांगोला रोडवर वेळापूरजवळ आज दुपारच्या सुमारास स्कोडा कंपनीच्या कारने अचानकपणे पेट घेतला. यात कार जळून खाक झाली आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
वाडेगाव (ता.सांगोला) येथील कलिंदर सरदार मुलाणी हे कुटुंबासह आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास सांगोलाहून वेळापूर मार्गे अकलूज कडे निघाले होते. वेळापूरजवळ सूर्या विजय ढाब्याजवळ कार आल्यावर कारने अचानक पेट घेतला. कारला आग मोठ्या प्रमाणात लागल्याने कार जागीच जळून खाक झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या कारमध्ये पाच ते सहा जण आणि लहान मुले प्रवास करत होती. कारने अचानक पेट घेतल्याचे स्थानिक लोकांच्या लक्षात आले. त्यांनी कारमध्ये बसलेल्या लोकांना व मुलांना बाहेर काढले व पाणी टाकून आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण आग मोठ्या प्रमाणात लागल्याने स्कोडा कार जागीच जळून खाक झाली.
वेळापूर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस नाईक अनिल बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल बंदुके, पोलीस कॉस्टेबल नवनाथ थिटे, तसेच निसार शेख सह स्थानिकांनी गाडीला लागलेली आग विझवली.