सोलापूर : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः माहिती दिली. त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
राजन पाटील यांनी आपल्या संदेशात म्हणाले की, माझी काल कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली तपासणी करून घ्यावी ही विनंती. मी सोलापूर येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलमधील डॉ.अक्कलवाडे आणि डॉ. शेटे यांच्या सल्ल्यानुसार होम क्वारंटाइन होऊन काळजी घेत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काळजी करण्यासारखं काही नाही. सर्वांनी मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सचे पालन करावे व स्वतःची काळजी घ्यावी असेही आवाहन पाटील यांनी केले आहे.
चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतले आहे. सोलापूर येथील सिद्धेश्वर हॉस्पिटलचे डॉ. अक्कलवाडे आणि डॉ. शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली औषध उपचार घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
“मी व्यवस्थित आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच सर्वांनी मास्क वापरावा, फिजिकल डिस्टन्सचे पालन करावे आणि स्वतःची काळजी घ्यावी”
राजन पाटील – माजी आमदार