जेजुरी : आज रंगपंचमी आहे. त्यानिमित्ताने नेहमी पिवळी धमक दिसणारी जेजुरी चक्क रंगीबेरंगी दिसत आहे. आज रंगपंचमीनिमित्त रोज पिवळ्या धमक सोनेरी रंगाच्या जेजुरी गडावरचा खंडोबा देव आज विविध रंगांनी न्हाऊन निघाला आहे. जेजुरी गडावर रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोजक्याच सेवेकऱ्यांनी नी आज रंगपंचमीचा सण साजरा केला.
जेजुरी गडावर खंडोबा देवाचा रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. -अभिषेक मुख्य भैरवनाथ मूर्तींना रंग लावून खास पूजा करण्यात आली. प्रातःकाळची भूपाळी पूजा-अभिषेक व आरती झाल्यानंतर मुख्य भैरवनाथ मूर्तीसह स्वयंभू लिंगाला विविध रंग लावण्यात आले. याद्वारे देवांची रंगपंचमी साजरी करण्यात आली.
नैसर्गिक रंगाचा वापर करण्यात आला. देवाची भूपाळी ,काकड आरती झाल्यावर पुजारी व सेवकांची लगबग सुरू झाली सदानंदाचा येळकोट असा जयघोष करीत खंडोबा म्हाळसादेवीला पंचरंगी श्रीखंडाचे स्नान घालण्यात आले.
दररोज पिवळी धमक दिसणारी जेजुरी आज शुक्रवारी मात्र, रंगीबेरंगी दिसत होती. जेजुरी गडावर खंडोबा देवाचा रंगपंचमी उत्सव साजरा करण्यात आला. मुख्य भैरवनाथ मूर्तींना रंग लावून खास पूजा – अभिषेक करण्यात आला. प्रातःकाळची भूपाळी पूजा-अभिषेक व आरती झाल्यानंतर मुख्य भैरवनाथ मूर्तींसह स्वयंभू लिंगाला विविध रंग लावण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
देवांना रंग लावल्यानंतर शहरामध्ये सणाच्या उत्साहाला उधाण आलं होतं आणि रोज पिवळी होणारी जेजुरी वेगळ्या रंगात बुडालेली दिसली. केवळ देवालाच नव्हे तर संपूर्ण मंदिरामध्ये विविध रंगांची आकर्षक अशी उधळण करत हा उत्सव साजरा करण्यात आला.
भारतीय लोककला संस्कृतीमधील लोकदेव आणि कुलदैवत असलेल्या खंडेरायाचे वर्षातील जत्रा-यात्रा, सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. जेजुरी गडावर साजरा होणाऱ्या बहुरंगी-बहुढंगी लोककला संस्कार परंपरेचे आणि सामाजिक बांधीलकीचे अनोखे दर्शन येथे घडत असते. सण उत्सवांची परंपरा म्हणून कुलदैवताची राजधानी असलेल्या जेजुरीच्या गडावर खंडेरायाची रंगपंचमी मोठ्या श्रद्धेने साजरी करण्यात आली.
या उत्सवामध्ये वर्षभर पिवळी धमक दिसणारी आणि सोन्याची असा नावलौकिक असलेली जेजुरी विविध रंगात बुडालेली पाहायला मिळाली.
गाभाऱ्याच्या भिंतीं रंग लावून सजविण्यात आल्या होत्या. पुण्यातील रंगावलीकार आशा खुडे यांनी गाभाऱ्यात खंडोबाची सुंदर रांगोळी साकारली, गडावरील नित्य वारकरी व पुजारी सेवक वर्गाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सचिन उपाध्ये नितीन बारभाई ,चेतन सातभाई ,जालिंदर खोमणे, सोमनाथ उबाळे ,कृष्णा कुदळे ,रियाज पानसरे, सिद्धेश आगलावे, महेश बारभाई यांनी रंगपंचमी उत्सवात सहभाग घेतला .सप्तरंगी उधळण झाल्याने साऱ्या परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.