सिंधुदुर्ग : अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत विरली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर तरी शिवस्मारक उभारण्यात यावे’, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे. तसेच ‘सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक उभारल्यास समुद्रात पायाभरणीचे शेकडो कोटी वाचतील आणि त्यातून त्या परिसरातील इतर सुविधा देता येतील’, असं त्यांनी म्हटलं.
अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याची राज्य सरकारची घोषणा हवेत विरली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील समुद्रातील सिंधुदुर्ग किल्ल्यावर तरी शिवस्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.
अरबीसमुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या घोषणा हवेतच आहेत, सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक उभारल्यास समुद्रात पायाभरणीचे शेकडो कोटी वाचतील व त्यातून त्या परिसरातील इतर सुविधा देतां येतील. ‘शिवसागरात’ उभारलेले शिवरायांचे स्मारक हे जगात एकमेवाद्वितीय असेल यात शंकाच नाही.#शिवस्मारक pic.twitter.com/2QPOuc5TJS
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) March 31, 2021
ट्वीट करून आमदार पाटील यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यात शिवस्मारक उभारण्याची मागणी केली आहे. समुद्रात पायाभरणीचे शेकडो कोटी रुपये वाचतील, आणि त्यातून परिसरात इतर सुविधा देता येतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.
अरबीसमुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या घोषणा हवेतच आहेत, सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवस्मारक उभारल्यास समुद्रात पायाभरणीचे शेकडो कोटी वाचतील आणि त्यातून त्या परिसरातील इतर सुविधा देतां येतील. ‘शिवसागरात’ उभारलेले शिवरायांचे स्मारक हे जगात एकमेवाद्वितीय असेल यात शंकाच नाही. असं ट्वीट राजू पाटील यांनी केलं आहे.
दरम्यान, फडणवीस सरकारच्या काळात अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर शिवस्मारक उभारण्याची घोषणा हवेत विरली आहे. राज्यात सत्ताबदल होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी आले. मात्र अरबी समुद्रातील शिवस्मारकाबाबत कोणत्याही प्रकारची हालचाल झालेली नाही. त्यामुळे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.