मुंबई : अनिल देशमुख गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे पद हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचा दावा भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीतील बड्या नावांची चर्चा असताना शर्यतीत अचानक हसन मुश्रीफांची एन्ट्री झाली आहे. मुश्रीफ तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते आहे. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवारांचा दावा कितपत खरा ठरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आता गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील की हसन मुश्रीफ ? #HomeMinister #surajyadigital #सुराज्यडिजिटल #political #NCP #ठाकरेसरकार #post pic.twitter.com/5E7TkB97qf
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
राष्ट्रवादीचा मुस्लिम चेहरा आणि शरद पवारांचे खंदे समर्थक एवढीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ओळख नाही, तर कोल्हापूर आणि कागलच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. सलग पाचव्यांदा निवडून येऊन ते कागलकरांच्या मनातील हिंदकेसरीही ठरले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुश्रीफ हे कोल्हापूरमधील कागल विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आले आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांचा पराभव केला. 28 हजार मतांनी त्यांनी समरजितसिंह यांना पराभूत केले. तर शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. विशेष म्हणजे माझी ही शेवटची निवडणूक आहे, असं भावनिक आवाहन संजय घाटेग यांनी केले होते. मात्र त्यांना केवळ 55 हजार 657 मते मिळाली. त्यांचा सलग पाचव्यांदा पराभव झाला. तर मुश्रीफ यांनी सलग पाचवेळा मैदान मारून कागलकरांच्या मनातला आपणच हिंदकेसरी असल्याचं दाखवून दिलं आहे.
नवा वसुली मंत्री कोण? – चित्रा वाघ https://t.co/yXV14NR4F4
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
अनिल देशमुख गृहमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर हे पद हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवले जाणार असल्याचा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार केला आहे. एकीकडे गृहमंत्रीपदासाठी राष्ट्रवादीतील बड्या नावांची चर्चा असताना या शर्यतीत अचानक हसन मुश्रीफ यांची एन्ट्री झाली आहे. उच्च न्यायालायने अनिल देशमुख यांच्यावरील आरोपाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर हसन मुश्रीफ तातडीने मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. त्यामुळे आता सुधीर मुनगंटीवारांचा दावा कितपत खरा ठरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गृहमंत्रीपद सोडले; अनिल देशमुख यांचं राजीनामा पत्र https://t.co/S6M8dHFvnj
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 5, 2021
* शैक्षणिक संस्था, सहकारी बँकांवर चेअरमन
हसन मुश्रीफ यांचा जन्म 1954 मध्ये झाला. त्यांनी अर्थशास्त्रातून बीएची पदवी घेतली आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्त्व आहे. त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. विद्यार्थीदशेपासूनच ते चळवळीत सक्रिय होते. दलित, मुस्लिम, शोषितांच्या विकासासाठी त्यांनी नेहमी आंदोलने केली. कर्नाटक सीमाप्रश्नावर शरद पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला होता. अनेक शैक्षणिक संस्था आणि सहकारी बँकांवर ते चेअरमन म्हणून सक्रिय आहेत. सहकार क्षेत्रातही ते कार्यरत आहेत.