सोलापूर : कल्याणराव काळे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत 8 एप्रिलला ते राष्ट्रवादीत प्रवेश करतील. कल्याण काळे हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातलं मोठं नाव आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपत आले होते. सध्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामुळे भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे.
कोरोना सेंटरमध्ये बाधित रुग्णाची आत्महत्या https://t.co/rHp5hkktSK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
मनधरणीसाठी आलेल्या खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी अजितदादांबरोबर ठरलंय? असा निरोप दिल्यानं निंबाळकर परतले. काळे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार बुधवारी बारामती येथे अजित पवार यांच्याशी झालेल्या अंतिम चर्चेनंतर काळे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाला. गुरुवारी अजित पवार यांच्या दौऱ्यात ते प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याची कुणकुण लागताच खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी सोमवारी दुपारी कल्याणराव काळे यांच्या संपर्क कार्यालयात मनधरणीसाठी गेले होते. त्याचवेळी आ. संजय शिंदे आल्याने दोघांचीही पंचाईत झाली होती. कल्याणराव काळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांच्या अडचणीत असलेल्या कारखान्याला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर ते आश्वासन पाळले नसल्याने काळे भाजपवर नाराज होते. ते राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. मात्र, अधिकृत प्रवेश केला नव्हता.
आठ दिवसांत ठाकरे सरकारची तिसरी 'विकेट' पडणार – पाटील https://t.co/MvbsdrO7gj
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
कल्याणराव काळे यांनी पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीदरम्यान भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत जाण्याचे जवळपास निश्चित केल्याची कुणकुण लागली. तेव्हा भाजपचे नेते, माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी काळेंनी पक्ष न सोडता भाजपसोबत राहावे यासाठी प्रयत्न केले. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटलांशीही संपर्क करून दिला. मात्र, काळे आपल्या मतावर ठाम होते. त्यामुळे मोहिते-पाटील पिता-पूत्रांसह निंबाळकरांची शिष्टाई अयशस्वी ठरली आहे.