मुंबई : अभिनेत्री दिया मिझाने 15 फेब्रुवारीला वैभव रेखीसोबत दुस-यांदा लग्नाची गाठ बांधली. लग्नानंतर अवघ्या दीड महिन्यातच दियाने बेबी बम्पसह फोटो शेअर करत गुडन्यूज दिली. दियाच्या फोटोवर एका इन्स्टाग्राम युझरने थेट लग्नाआधीच प्रेग्नन्सी जाहीर का नाही केलीस? असा सवाल केला. त्यावर उत्तर देताना दियाने लग्नाआधी गरोदर असल्याचं अप्रत्यक्षपणे कबूल केलं.
यावर दिया त्या नेटकऱ्याला म्हणाली, “खूप रंजक प्रश्न आहे हा. सर्वांत आधी, मी गरोदर होते म्हणून आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला, असं अजिबात नाही. आम्हाला एकमेकांसोबत उर्वरित आयुष्य घालवायचं होतं, म्हणून आम्ही लग्नाचा निर्णय घेतला. लग्नाची तयारी सुरू असतानाच मी गरोदर असल्याचं समजलं. त्यामुळे गरोदर असल्यामुळे लग्न केलं असं नाही.
कल्याणराव काळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये करणार प्रवेश https://t.co/tpFPeQSo5V
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
फक्त काही वैद्यकीय कारणांमुळे मी तुम्हाला आधी माझ्या गरोदरपणाविषयी सांगितलं नव्हतं. ही माझ्या आयुष्यातील सर्वांत गोड आणि आनंदाची बातमी आहे. मी गेल्या अनेक वर्षांपासून या क्षणाची वाट पाहत होते. त्यामुळे ही बातमी तुमच्यापासून लपवण्यामागे वैद्यकीय कारणांशिवाय इतर कोणतंच कारण नाही.”
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
यासोबतच दियाने आणखी काही गोष्टी स्पष्ट केल्या. “१- मूल होणं ही जीवनातील सर्वांत सुंदर देणगी आहे. २- या सुंदर प्रवासात कोणत्याही प्रकारची लाज बाळगू नये. ३- महिला म्हणून आपल्याला आपला पर्याय निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे. ४- मग तो पर्याय एकटं राहून मूल दत्तक घेण्याचा असो किंवा मग लग्नानंतर मूल होण्याचा पर्याय असो. पर्याय निवडण्याचा अधिकार आपल्याला हवा. ५- एक समाज म्हणून आपण काय चूक आणि काय अचूक हे ठरवण्यापेक्षा काय योग्य आणि काय अयोग्य हा विचार केला पाहिजे.”