मुंबई : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं. राज्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. कारण, बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाही. त्यामुळे त्या राज्यातले आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात, असं राज म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुंकाचा प्रचार जोरात असतानाही तिकडे कोरोनाची लाट येत नाही पण महाराष्ट्रातच का येते, याला परराज्यात येणारे लोक जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली.
ठाकरे बंधू, एकमेकांशी संवाद करताना, या फोटोला काय कॅप्शन द्याल? #surajyadigital #राजठाकरे #उद्धवठाकरे #सुराज्यडिजिटल #RajThackeray #UddhavThackeray #संवाद pic.twitter.com/EnQE8SJFFm
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी आपण कोरोनाच्या परिस्थितीवर चर्चा केली, या चर्चेत काय बोलणे झाले याची माहिती राज ठाकरेंनी दिली. सोमवारी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झूम कॉलवर लॉकडाऊनवर चर्चा केली, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातच रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे, याबाबत बोलणे झाल्याचे राज ठाकरेंनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. यामुळे राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. ‘या संदर्भाने मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटीची वेळ मागितली होती. पण मुख्यमंत्री क्वारंटाईन असल्याने ही भेट होऊ शकली नाही.’ असं राज ठाकरे आज पत्रकार परिषदेत म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या घरात पत्नी रश्मी, मुलगा मंत्री आदित्य हे कोरोना पॉझिटीव्ह आहेत.
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
महाराष्ट्रात उद्योग जास्त असल्याने बाहेरील राज्यांमधून येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्यामागे बाहेरुन येणारी लोक आहेत. इतर अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोजले जात नसल्याने तिथले आकडेच येत नाहीत, असे सांगत एकप्रकारे राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केली.
याचबरोबर काही मागण्याही केल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण ऑनलाईन सुरू असल्याने शाळांची फी निम्मी करावी, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करा, खेळाडूंना सरावासाठी परवानगी द्या. गर्दी होणार नाही तिथे जिममध्ये व्यायाम करण्यासाठी परवानगी द्या सातत्याने होणाऱ्या लॉकडाऊनमुळे शेतकरी अडचणीत आला असल्याने हमीभाव द्यावा, अशा मागण्या त्यांनी केल्या.
कोरोना सेंटरमध्ये बाधित रुग्णाची आत्महत्या https://t.co/rHp5hkktSK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
* कोरोना केंद्राचा विषय, आज लाट इकडे आहे उद्या तिकडे असेल- राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. देशात अन् राज्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबद्दल एकट्या राज्य सरकारला बोलून चालणार नाही, कोरोना देशाचा विषय आहे. आज लाट इकडे आहे उद्या तिकडे असेल. तसेच, आरोग्य या विषयावर राज्य आणि केंद्राने लक्ष देणं आवश्यक आहे. इतर राज्यातून येणाऱ्या कामगारांची मोजणी करुन त्यांची कोरोना टेस्ट करावी, अशी मागणीही राज यांनी केली आहे.