पुणे : ठाकरे सरकारमधील आतापर्यंत दोन मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. एक नाही आणि दोन राजीनामे झाले आणि येत्या आठ दिवसांत तिसरा राजीनामा होणार आहे, असं पाटील म्हणाले. भाजपाच्या वर्धापन दिनानिमित्त पुणे येथून व्हर्च्युअल माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना संबोधित केलं. यावेळी ते बोलत होते.
शिवसेना नेते संजय राठोड यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एक मोठं विधान केलं आहे.
इतर राज्यात कोरोना टेस्टच केली जात नाही म्हणून तिथले आकडे येत नाहीत : राज ठाकरे https://t.co/CvnoHKW0H0
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
येत्या आठ दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मात्र, या मंत्र्याचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे ठाकरे सरकारमधील कोणता मंत्री राजीनामा देणार? याबाबतचे तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
मोठी बातमी ! एन. व्ही. रमन्ना यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती
https://t.co/gM0K1g8Z7P— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी हा दावा केला आहे. येत्या आठ दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार आहे. तो मंत्री कोण आहे, हे तुम्हीच शोधा, असं सूचक वक्तव्यही त्यांनी केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यामुळे एकच खळबळ उडाली असून राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. तसेच तुमच्या कर्माने तुम्हीच मरणार आहात, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
भाजपचा आज वर्धापन दिन होता. त्यामुळे आम्ही सर्वांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर लढून चांगलं यश मिळवलं आहे. त्यामुळे या पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार आहोत. कुणाच्याही कुबड्या आम्हाला नकोत. अर्थातच आमचे सहयोगी पक्ष आमच्यासोबत असतीलच, असंही ते म्हणाले. स्वबळावर लढून राज्यात सरकार आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.