मुंबई : अभिनेत्री कॅटरिना कैफलाही कोरोनाची लागण झाली आहे. ती सध्या होम क्वारंटाईन आहे. याआधी अभिनेता विकी कौशल, अभिनेत्री भूमी पेडणेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोमवारी समोर आली. त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. तर आलिया भट्ट, मनोज वाजपेयी, आमिर खान, आर. माधवन, गोविंदा आणि अक्षय कुमार यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाच्या विळख्यात आता बॉलिवूडचे अनेक कलाकार अडकत आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक बॉलिवूडच्या कलाकार पॉझिटिव्ह येत आहे. काल अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि चॉकलेट बॉय विकी कौशल कोरोनाबाधित आढळले होते. आता विकी कौशल पाठोपाठ अभिनेत्री कतरिना कैफला कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती कतरिनाने स्वतः आपल्या इन्स्टाग्रामच्या स्टोअरीवरून शेअर केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एमपीएससीची परीक्षा वेळापत्रकानुसारच
https://t.co/9bdMQqWNQ5— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
कतरिनाने लिहिले आहे की, ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी त्वरित स्वतःला आयसोलेटेड केले असून होम क्वारंटाईनमध्ये आहे. डॉक्टरांच्या सल्लानुसार सुरक्षितेबाबतचे सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे. जे कोणी गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आले आहे, त्यांनी त्वरित कोरोना चाचणी करा, अशी विनंती आहे. मी सर्वांची कृतज्ञ आहे. सुरक्षित राहा आणि काळजी घ्या.’
Actor Katrina Kaif tests positive for #COVID19; she is under home quarantine.
(File photo) pic.twitter.com/EEZi1sgg2S
— ANI (@ANI) April 6, 2021
दरम्यान गेल्या अनेक महिन्यांपासून बी टाऊनमध्ये विकी आणि कतरिनाच्या अफेअरची चांगली चर्चा सुरू आहे. दोघे एकमेकांना डेट करत असल्याचे म्हटले जात आहे. तसेच या दोघांना अनेक कार्यक्रमात एकत्र पाहिले आहे. त्यामुळे आता दोघ एकत्र कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या अफेरच्या चर्चेत आणखीनच भर पडली आहे.
हो, मी लग्नाआधीच प्रेग्नंट होते – दिया मिर्झा https://t.co/mtYEBBt0sn
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 6, 2021
* बॉलिवूडमध्ये कोरोनाचा शिरकाव
देशात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. गेल्या काही दिवसांत, अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली. अलीकडच्या काळात अक्षय कुमार, आमिर खान, आलिया भट्ट, आर माधवन, रणबीर कपूर, चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गायक आदित्य नारायण पत्नी श्वेता अगरवाल, अभिनेत्री भूमी पेडणकर, विक्की कौशल, कॉमेडीयन कुणाल कामरा, शशांक खेतान, मनोज बाजपेयी, यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांना कोरोनाची लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.