माढा : उंदरगाव (ता. माढा) येथील सेवानिवृत्त प्राध्यापक सुभाष सिद्राम काळे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत 4 लाख 73 हजार रुपयांचा सोन्याचांदीसह रोख रकमेचा ऐवज लंपास केलाय. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ही चोरी मंगळवार ( ता. 6 एप्रिल ) रात्री 2 ते 3 च्या सुमारास झाली.
अनिल देशमुखांनी माझ्या नियुक्तीसाठी 2 कोटी मागितले, सचिन वाझे यांचा गंभीर आरोप https://t.co/VZTAEef5NZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 7, 2021
याबाबतची अधिक माहिती अशी की सुभाष काळे हे गतवर्षी प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत. बुधवारी त्यांच्या मुलाचा घरी टिळ्याचा कार्यक्रम होता. यामुळे 6 तारखेला घरातील सर्वजण कामे आटोपून घरातील काही जण पहिल्या मजल्यावर तर फिर्यादी सुभाष, पत्नी मुले हाॅलमध्ये झोपली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पहाटे चार वाजता जाग आल्यानंतर पाहिले असता घराच्या दारांना बाहेरून कड्या घातल्या होत्या.याचवेळी मागील बाजूच्या दाराचे कडीकोयंडे तोडून अज्ञात चोरांनी घरात प्रवेश केल्याचे दिसून आले.आतल्या खोलीत असलेले कपाट तोडून त्यातील रोख रक्कम 35 हजार व सोन्याचे दागिने असे 4 लाख 73 हजार रुपयांचा ऐवजावर डल्ला मारल्याचे लक्षात आले.
आज दुपारी पोलीस उपविभागीय अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे आदीसह सोलापूरहून मागवलेले श्वानपथक घटनास्थळी दाखल झाले.मात्र उन्हाच्या तडाख्याने श्वान घराच्या परिसरात घुटमळत राहिले. यामुळे पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे अद्याप लागलेले नाहीत.
आज जागतिक आरोग्य दिन, सलाम त्या सर्व कोरोना योद्ध्यांना #surajyadigital #योद्धा #आरोग्यदिन #जागतिक #सलाम #सुराज्यडिजिटल #कोरोना #HealthDay pic.twitter.com/em6ygpirw1
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 7, 2021
मुलाच्या लग्नासाठी केलेले दागिने आणि रोख रक्कम हातोहात लंपास केल्याने काळे कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे पुढील तपास करीत आहेत.