मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ‘ब्रेक दि चेनच्या’ अंतर्गत राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 7, 2021
दरम्यान, या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नसून पूर्वीप्रमाणे ५ रूपयात शिवभोजन थाळी उपलब्ध होणार आहे, असंही ते म्हणाले.
अनिल देशमुखांनी माझ्या नियुक्तीसाठी 2 कोटी मागितले, सचिन वाझे यांचा गंभीर आरोप https://t.co/VZTAEef5NZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 7, 2021
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण राज्यात ‘ब्रेक दि चेनच्या’अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यात शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात जनतेला उपलब्ध करून देण्याचे आदेश मंगळवारी दिले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना काळात मजूर, कामगार, शेतकरी वर्गासह सर्वसामान्य जनतेला शिवभोजन थाळी मोठा आधार देत आहे. राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सर्व हॉटेल, रेस्टॅारंट यांना पार्सल सुविधा देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता शिवभोजन केंद्रावर देखील शिवभोजन थाळी ही पार्सल स्वरूपात उपलब्ध होणार असल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले.
सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरी पावणेपाच लाखांची घरफोडी https://t.co/wwN2BODEG1
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 7, 2021
सरकारने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन जनतेने करावे आणि प्रशासनाला मदत करावी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या पार्सल सुविधेच्या निर्णयामुळे शिवभोजन थाळीच्या किंमतीमध्ये कोणताही बदल केलेला नसून पूर्वीप्रमाणेच ५ रूपयात शिवभोजन थाळी सर्वसामान्य जनतेला उपलब्ध होणार आहे, असेही छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.