सोलापूर / पंढरपूर : लोकांना लॉकडाऊन नको आहे. शेवटी माणसंही जगली पाहिजेत. 18 वर्षांच्या पुढील लोकांना लस द्या. परदेशात लस पाठवण्याच्या आधी आपल्या देशात लस द्या. स्वतःचं पोट उपाशी ठेवून शेजाऱ्याला लस दिले जाते. आपल्याकडे यंत्रणा आहे. सीरमवर केंद्राचं कंट्रोल आहे, नाहीतर आम्ही सीरमला लस द्यायला सांगितलं असतं. मात्र राजकारण केले जाते.” असंही अजित पवार म्हणाले.
आज सोलापुरात भाजप नेते कल्याणराव काळे यांनी माझ्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असून त्यांचं स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!@NCPspeaks pic.twitter.com/YKRU4ooAaV
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) April 8, 2021
राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालकेंच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी केंद्रावर टीका केली. यावेळी कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावरही पवारांनी वेगळ्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. “कल्याणराव काळे पवार साहेबांकडे चालले, असं समजलं की भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागलं. भाजपचे सगळेच कल्याणरावांच्या घरी जायला लागले. शरद पवार साहेबांचा कल्याणराव काळे यांना निरोप आहे, की भगीरथ चांगल्या मतांनी निवडून आला पाहिजे.” असं अजितदादांनी कल्याणरावांना सांगितलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अजित पवार म्हणाले, पाच वर्षांसाठी इथल्या जनतेने भारत नानांना निवडून दिले होते, त्यांचं काम पण सुरु होतं, मात्र काळाने घाला घातला. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील नागरिकांनी भगीरथ भालकेला विधानसभेत पाठवायचे आहे. भगीरथ भालके यांनी भारत नानांचे राहिलेले स्वप्न पूर्ण करावे, राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सर्व ताकद लावीन” अशी हमी अजित पवारांनी दिली.
कोरोना दुपटीने वाढतोय, देशाचे नेते शरद पवार लाईव्ह येऊन आकडेवारीसह माहिती देताना #SharadPawar #coronavirus #surajyadigital #सुराज्यडिजिटल #CoronavirusOutbreak #शरदपवारhttps://t.co/1yUwTPrYFd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
* प्रश्न सोडवण्याची धमक फक्त महाविकास आघाडीत
“हे पांडुरंगा राज्यावर आलेलं कोरोनाचं संकट दूर कर” असं म्हणत अजित पवारांनी पांडुरंगाला साकडे घातले. “कोरोना राज्यात वाढलाय. त्यासाठी नियम पाळावे लागतायत. कोरोना नियंत्रणसाठी केंद्राने लस द्यायला पाहिजे. जनतेने आमच्यावर प्रेम केले म्हणून तीस वर्षे राजकारणात आहोत. भाजप हा ग्रामीण भागात फारसा लोकप्रिय नाही. अजून काही प्रश्न सोडवायचे आहेत, हे प्रश्न सोडवण्याची धमक फक्त महाविकास आघाडीत आहे. काळानुरुप नवीन लोकांना संधी द्यावी लागते” असंही अजित पवार म्हणाले.
* …हा शहाणा सांगतो मास्क काढा
पंढरपुरात अजित पवारांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी अजित पवार बोलायला उभे राहिले. अजित पवार भाषण करत असताना त्यांना एक चिठ्ठी आली. त्यावर “दादा मास्क काढा” असं लिहिलेलं होतं. ती चिठ्ठी अजित पवारांनी जाहीर वाचून दाखवली. “मी जनतेला सांगतो मास्क वापरा आणि हा शहाणा सांगतो मास्क काढा म्हणून” असं अजितदादा म्हणताच एकच हशा पिकला.
पुढील दोन दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाचा इशारा #surajyadigital #rain #पाऊस #सुराज्यडिजिटल #इशारा pic.twitter.com/UAhbB5ahlW
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
* कल्याणराव काळेंच्या घरी काढला व्यापा-यांचा रुसवा
उपमुख्यमंत्री अजित पवार पोटनिवडणूक प्रचारासाठी पंढरपूरमध्ये आले आहेत. राज्यात वाढत आसलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव यामुळे निर्बंध कडक करीत काही सेवा वगळता लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यापारी नागरिक नाराज आहेत. अजित पवार येताच त्यांनी व्यापाऱ्यांसोबत बैठक घेत रुसवा काढण्यात वेळ घालवला.
पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा होणार अॉनलाईन #online #exam #graduates #पदवी #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/eMvceUg00W
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
कल्याणराव काळे यांच्या घरी झालेल्या बैठकीत त्यांनी व्यापाऱ्यांच्या तक्रारी एकूण घेतल्या व राज्यात कोरोनाची परिस्थिती किती गंभीर आहे याबाबत व्यापाऱ्यांना सूचित केले. मात्र राज्य सरकार व्यापाऱ्यांसोबत असून येत्या दोन दिवसात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे आश्वासन अजित पवार यांनी व्यापाऱ्यांना दिले.