सांगली : कोरोना कोरोना म्हणत सगळी प्रजा भंपक आणि बावळट बनत चालली आहे. जे जगायचे ते जगतील, जे मरायचे ते मरतील. असं वक्तव्य शिवप्रतिष्ठाणचे संभाजी भिडेंनी केलं आहे. तसेच, कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला आहे. हा सगळा मूर्खपणा आहे. प्रत्येकाला जीवाची काळजी आहे, सरकारने यात लक्ष घालू नये. लॉकडाऊनची गरज नाही. व्यसने वाढवायचे गांजा, मटका सगळे मोकाट, पण तालमी, मैदान बंद, असं भिडे म्हणाले.
मुळात कोरोना हा रोग नाही, कोणत्या शहाण्याने हा मास्क लावण्याचा सिद्धांत काढला, मूर्खपणा आहे, ऐका काय म्हणाले संभाजी भिडे #Corona #disease #mask #stupid #SambhajiBhide #संभाजीभिडे #surajyadigital #सुराज्यडिजिटलhttps://t.co/RNmTK7oRLC
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडले आहेत. सध्या देशात कोरोना महामारीमुळे लोकांचा मृत्यू होत असताना भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “मुळात कोरोना हा रोग नाही. कोरोना हा मानसिक आजार आहे. कोरोनामुळे मरणारी माणसं ही जगण्याच्या लायकीची नाहीत. कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लादणे हा मुर्खपणा आहे.” असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी म्हटलं आहे.
मुळात कोरोना हा रोग नाही आणि कोरोनामुळे जी माणसं मरतात ती जगायच्या लायक नाहीत. तो XX (आक्षेपार्ह शब्द) प्रवृत्तीच्या लोकांना होतो, तो मानसिक आजार आहे,” असं अजब वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. तसंच कोरोना निर्बंधांवरुन त्यांनी राज्य सरकारवर गंभीर टीकाही केली आहे. सामान्य नागरिकांनी सरकारविरोधात बंड करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
कोरोना दुपटीने वाढतोय, देशाचे नेते शरद पवार लाईव्ह येऊन आकडेवारीसह माहिती देताना #SharadPawar #coronavirus #surajyadigital #सुराज्यडिजिटल #CoronavirusOutbreak #शरदपवारhttps://t.co/1yUwTPrYFd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
संभाजी भिडे म्हणाले की, “समाजाचा संसार चालवण्यासाठी शासन आहे. मात्र शासन हे दुशासन होता कामा नये, निव्वळ मूर्खपणा सुरु आहे. शासनाचे निर्णय घातकी आहेत. संसार आणि व्यापारी माती मोल झाले. लॉकडाऊनचा निर्णय घेणाऱ्या शासनकर्त्यांना कवडीमोल अक्कल नाही.”
भारतातून न्यूझीलंडमध्ये जाणा-यांना 'नो एन्ट्री' https://t.co/IpAnVInRjw
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
“लॉकडाऊनमध्ये खासदार आणि आमदारांचे पगार सुरू आहेत, त्यांचे पगार परत घेऊन, सरकारी खजिन्यात जमा करावेत. सामान्य माणसांची उपासमार सुरु आहे. त्यामुळे लोकांनी बंड करुन उठलं पाहिजे. सामान्य माणसांचा विचार नसलेले राज्यकर्ते राज्यापासून संपूर्ण देशात आहेत, असलं सरकार फेकून दिल पाहिजे,” असंही संभाजी भिडे म्हणाले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
“कोरोना हा रोगच नाही, तो XX (आक्षेपार्ह शब्द) प्रवृत्तीच्या लोकांना होतो, तो मानसिक आजार आहे. दारु दुकाने उघडी आणि भाजी विकणाऱ्यांना पोलीस काठ्या मारतात,” असं भिडे गुरुजी म्हणाले.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यात सुरु असलेल्या परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकारही जबाबदार आहे. कोरोनाच्या बाबतीत देशात खेळखंडोबा चालू आहे, जे जगायचे ते जगातील जे मरायचे ते मरतील, असं असंवेदनशील वक्तव्य त्यांनी केलं. तसंच मिलिट्रीला आपण काय मास्क लावून लढायला सांगणार आहोत का? असा सवाल त्यांनी विचारला.
सीरमवर केंद्राचे कंट्रोल, म्हणूनच राजकारण केले जाते – अजित पवार, काळेंच्या घरी काढला व्यापा-यांचा रुसवा …हा शहाणा सांगतो मास्क काढा https://t.co/SH7k9MJQ1u
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
एकीकडे कोरोनाची दुसऱ्या लाटेच्या चिंतेने महाराष्ट्र चिंतेत आहे. महाराष्ट्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करून या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. चौकाचौकात पोलीस मास्क नसलेल्या नागरिकांवर दंड आकारत आहेत. भिडे यांनी आमदाराला मास्क काढून उद्घाटन करायला लावणं योग्य आहे का? असा सवाल उपस्थित होतो.
* संभाजी भिडेंनी शिवसेना आमदाराला मास्क काढायला लावला होता
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर तसेच संभाजी भिडे एकत्र आले होते. यावेळी भिडे यांनी खानापूर आटपाडी चे आमदार अनिल बाबर यांना आधी मास्क काढा आणि मग उद्घाटन करा असे फर्मावले. आमदारांनी हा आदेश मानत स्वतःच्या तोंडावरचा मास्क उतरवला. गर्दीत होत असलेल्या या कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी मास्क घातलेला नव्हता. व त्यांनी आमदारांना घातलेला मास्क देखील उतरवायला लावला होता.