नवी दिल्ली : महाराष्ट्रात कोरोना लसीचा तुटवडा होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. त्याला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिले. महाराष्ट्रात 5 लाख डोस खराब केले. कारण आरोग्य मंत्रालयाने नियोजनच केले नाही. राज्य सरकार आपले काम ठीक करत नसून दुसऱ्यांना दोष देत आहे. महाराष्ट्रात 23 लाख डोसेस शिल्लक आहेत. राज्यात 5 ते 6 दिवसांची लस शिल्लक असल्याचे जावडेकर म्हणाले.
केंद्रीय आरोग्यमंत्री आता राज्य आणि लोकांवर दोषारोप करताहेत. मुंबईत पालिकेमार्फत घरोघर लस देऊ द्या म्हणून केलेली विनंती policy नाही म्हणून धुडकावली गेली. आता मुंबई कोसळते आहे तर राज्य आणि लोक दोषी आहेत. वा!!
— Deepak Lokhande (@WriterDeepak) April 7, 2021
महाराष्ट्रात गेल्या तीस दिवसांपासून सुरू असलेल्या गोंधळाचा रेकॉर्ड ठेवणंही कठीण काम आहे. इतकं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम महावसुली आघाडी सरकारनं केलं आहे. सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहे. सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरलेला नाहीय”, असा हल्लाबोल केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज केला आहे. ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्रात 23 लाख कोरोना लस शिल्लक, लसीच्या तुटवड्यावर जावडेकरांचे प्रत्युत्तर #corona #vaccnie #23lakh #jawadekar #maharashtra #महाराष्ट्र #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/e0m9S1nUzU
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. “सचिन वाझेचे कारनामे एनआयएच्या चौकशी आता उघड झाले आहेत. अशा व्यक्तीचं मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत समर्थन का केलं? वाझे काहीतरी खुलासे करेल म्हणूनच त्याला पाठिशी घातलं जात होतं.
महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या.
तसे ट्विट डीजीआयपीआरने 6 एप्रिल रोजी केले आहे.
91 लाख लसी वापरल्या.
म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत.
मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय❓
(2/n) #MaharashtraHasVaccines pic.twitter.com/BA4MMK2t1S— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 8, 2021
आता वाझे यानं लिहिलेल्या पत्रात अनेक नेत्यांवर गंभीर आरोप करण्यात आले आहे. हे अतिशय गंभीर आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारं प्रकरण आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला आता सत्तेत राहण्याचा अधिकारच उरलेला नाही”, असा हल्लाबोल जावडेकर यांनी केला आहे.
भारतातून न्यूझीलंडमध्ये जाणा-यांना 'नो एन्ट्री' https://t.co/IpAnVInRjw
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
महाविकास आघाडी सरकार हे जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही. हे सरकार फक्त वसुली सरकार आहे. जनतेनं भाजपा आणि शिवसेना युतीला मतदान करुन कौल दिला होता. पण शिवसेनेनं गद्दारी करुन विरोधी पक्षाला हात मिळवला आणि जनतेनं दिलेल्या मतदानाचा अपमान केला, अशी टीका जावडेकर यांनी यावेळी केली.