वेलिंग्टन : भारतात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे न्यूझीलंड या देशाने भारतातून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या देशात प्रवेश देण्यास नकार दिला आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी यासंदर्भात आदेश काढले आहेत. भारतीय प्रवासी आणि भारतामधून न्यूझीलंडमध्ये जाणाऱ्या इतर कोणत्याही देशाच्या प्रवाशांना आता तिथे प्रवेश दिला जाणार नाही. ११ एप्रिलपासून २८ एप्रिलपर्यंत ही बंदी राहणार आहे.
महाराष्ट्र कोरोनाने त्रस्त, राज्य सरकार वसुलीत व्यस्त, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी केले महाराष्ट्र सरकारवर आरोप #maharashtra #central #government #सुराज्यडिजिटल #surajyadigital pic.twitter.com/GMXLomK6m8
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
देशात कोविड १९ विषाणूची दुसरी लाट अधिकच संसर्ग पसरवणारी ठरली आहे. मंगळवारी देशात १.१५ लाख नवीन रुग्ण सापडले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आता देशात एकूण १ कोटी २८ लाख १७८५ लोक करोनाबाधित झाले आहेत. गेल्या चार दिवसांत दुसऱ्यांदा रुग्णवाढीचा उच्चांक गाठला गेला आहे.
कोरोना दुपटीने वाढतोय, देशाचे नेते शरद पवार लाईव्ह येऊन आकडेवारीसह माहिती देताना #SharadPawar #coronavirus #surajyadigital #सुराज्यडिजिटल #CoronavirusOutbreak #शरदपवारhttps://t.co/1yUwTPrYFd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
देशातील करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आता न्यूझीलंड सरकारने भारतामधून येणाऱ्या नागरिकांना परवानगी नाकारली आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान भारतातून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला न्यूझीलंडमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात नव्याने आढळून आलेल्या २३ रुग्णांपैकी १७ रुग्ण हे भारतातून न्यूझीलंडमध्ये दाखल झालेले प्रवासी आहेत.
Jacinda Ardern says New Zealand will ban arrivals from India from Sunday through April 28. Yesterday, 17 travellers originally from India tested positive for #Covid19 in MIQ. #nzpol #Covid19nz
— Marc Daalder 😷 Wear a Mask (@marcdaalder) April 8, 2021
त्यामुळेच भविष्यात ही संख्या वाढू नये म्हणून भारतातून येणाऱ्या प्रवाशांना पुढील दोन आठवडे परवानगी नाकारण्यात आलीय.न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा आर्डेन यांनी यासंदर्भातील आदेश दिलेत. भारतामधून येणाऱ्या नागरिकांना देशात प्रवेश करण्यावर तात्पुरत्या स्वरुपाची बंदी घातली आहे. ही बंदी न्यूझीलंडचे नागरीक असणाऱ्या मात्र सध्या भारतात असणाऱ्या व्यक्तींनाही लागू असणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारतामध्ये करोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने आर्डेन यांनी हा निर्णय घेतला असल्याचे समजते. न्यूझीलंड सरकारने जारी केलेली ही बंदी जवळजवळ दोन आठवडा कायम राहणार आहे. त्यामुळेच ११ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान कोणत्याही व्यक्तीला भारतामधून न्यूझीलंडला जाता येणार नाही. “या तात्पुरत्या निर्बंधांमुळे अडचणी निर्माण होतील याचा मला अंदाज आहे. मात्र त्याचबरोबरच प्रवाशांच्या माध्यमातून करोनासंदर्भात निर्माण होणारा धोका कमी करण्याची जबाबदारी आमच्यावर असल्याने हा निर्णय घ्यावा लागत आहे,” असंही आर्डेन यांनी स्पष्ट केलं आहे.
पुन्हा लॉकडाऊनची चर्चा, मोदींची आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा #surajyadigital #pm #cm #सुराज्यडिजिटल #चर्चा #lockdowan #लॉकडाऊन pic.twitter.com/M1aa97vBwi
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 8, 2021
पहिल्यांदाच न्यूझीलंडने अशाप्रकारे कोणत्याही देशातून स्वत:च्या देशात परतणाऱ्या नागरिकांवर बंधने घातली आहेत. सध्या जगभरातील अनेक देशांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. असं असलं तरी भारतातून न्यूझीलंडला येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आलाय. असंही आर्डेन यांनी स्पष्ट केलं आहे. यापुढील निर्णय तेव्हाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन घेण्यात येईल असंही सांगण्यात येत आहे.