नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना कोरोनाची लागण झाली आहे. संघानं शुक्रवारी रात्री उशिरा ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मोहन भागवत यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहेत. त्यांच्यामध्ये काही हलकी लक्षणं असल्यानं त्यांना नागपुरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत के कोरोना पॉजीटिव होने की खबर मिली। उन्हें शीघ्र स्वास्थ्य लाभ मिले ईश्वर से यही कामना करता हूं।
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) April 9, 2021
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील रात्री उशिरा याबाबत ट्विट केलं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक आदरणीय डॉ. मोहनजी भागवत यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली. त्यांना लवकरच बरं वाटावं, अशी देवाकडे प्रार्थना करतो, असं गडकरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सातारा : लॉकडाऊनला विरोध करीत खासदार उदयनराजे यांनी भीकमांगो आंदोलन केले. #surajyadigital #सुराज्यडिजिटल #udhyanraje #lockdown #satarahttps://t.co/NmJsD1Y0Pk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 10, 2021
नागपूर, पुणे आणि मुंबई यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरुवारी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आणि कोरोनासोबत लढा देण्यासाठी उपाययोजनाही सुचवल्या. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण देशात लसीकरण मोहिमेलाही वेग आला आहे.