सोलापूर : कोरोना काळात काम करत असताना कित्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना कोरोनाची लागण होत असून, अनेकांचा मृत्यू देखील झाला आहे. सोलापूर ग्रामीण पोलिस दलात आजतागायत 339 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, यात एका अधिकाऱ्याचा व चार पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
तुमच्या पोस्टवर कोणी कमेंट करायची हे तुम्हीच ठरवा, नवीन फिचर https://t.co/bnd2DczcKU
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 13, 2021
कोरोनाशी लढा देताना एका अधिकाऱ्यासह 4 कर्मचाऱ्यांचा मृत्यूआजअखेर एका अधिकाऱ्यासह दोन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने, शासनाची आर्थिक मदत मिळाली आहे. गेल्या वर्षभरापासून राज्यासह संपूर्ण देशात कोरोना या महामारीने हाहाकार माजवला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
खून, मारामारी, दरोडे, चोरी अशा विविध गुन्ह्यांचा तपास करत पोलिस कर्मचारी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता स्वतःचा जीव धोक्यात घालून, “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलिस प्रशासनाच्या ब्रीदवाक्याला साजेसे असे आपले काम अविरतपणे करत आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे आज रात्री जनतेशी साधणार संवाद, लॉकडाऊनबाबत घोषणा होण्याची शक्यता #संवाद #मुख्यमंत्री #ठाकरे #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/BP8gYKXi46
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 13, 2021
अचानक आलेल्या या संकटामुळे सर्वांची एकच धांदल उडाली आहे. तरीदेखील प्रशासन सातत्याने यावर अटकाव घालण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करीत आहे. यात महत्त्वाची भूमिका पोलिस प्रशासन व आरोग्य कर्मचारी बजावत आहेत. नागरिकांना कोरोनाची बाधा होऊ नये याकरिता गेल्या वर्षभरापासून पोलिस कर्मचारी गावोगावी तसेच नाकाबंदी करून नागरिकांना शासनाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आव्हान करताना दिसत आहेत.
30 टक्के निधी कोरोनाच्या उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी https://t.co/y3zP9qpkMn
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
* वर्षभर काय झाले, आताचे नियोजन
गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला. तर 12 एप्रिल 2020 रोजी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्या वेळी सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोज पाटील व अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी पोलिसांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात सॅनिटायझर तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढीच्या गोळ्या देऊन खबरदारीसाठी चांगले प्रयत्न केले होते.
मुंबईत 7 दिवसात 279 पोलिसांना कोरोनाची लागण https://t.co/5JOW4QtTzX
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 13, 2021
खबरदारी घेऊनही कित्येक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली व ती आजही सुरू असल्याने, उपचार घेण्यासाठी होत असलेली धावपळ लक्षात घेऊन, नुकतेच पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसाठी कोव्हिड सेंटरची उभारणी केली आहे. नागरिकांची खबरदारी घेत असताना पोलिस देखील कोरोनाबाधित होत असल्याने, नागरिकांनी पोलिस प्रशासनाने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला सहकार्य केले पाहिजे.