मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबई पोलिसांनाही मोठा फटका बसला आहे. अवघ्या 7 दिवसात मुंबई पोलीस दलातील 279 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, 11 एप्रिलपर्यंत मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 7997 वर गेली होती.
रेमडिसीवर औषध उपलब्ध करून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील, प्रशासनाचे दुर्लक्ष #surajyadigital #रेमडीसीवर #remadisiver #भाजप #सुराज्यडिजिटलhttps://t.co/4qeEQxf30u
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 13, 2021
त्यापैकी 7442 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सध्या 454 पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 101 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या सात दिवसात मुंबईत 279 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या रविवारी एका पीएसआयचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
11 एप्रिलपर्यंत मुंबईतील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 7997 वर गेली होती. त्यापैकी 7442 पोलिसांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. सध्या 454 पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 101 पोलिसांचा मृत्यू झाला आहे.
ऑनलाईन पैसे पाठविणाऱ्यांसाठी मोठी बातमी; रविवारी RTGS सेवा 14 तासांसाठी बंद https://t.co/iLyn57Tsnp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 13, 2021
दरम्यान, आतापर्यंत मुंबईतील 70 टक्के पोलिसांना कोरोना व्हॅक्सीनचा डोस देण्यात आला आहे. 11 एप्रिलपर्यंत 30,756 पोलिसांना कोरोनाचा पहिला डोस देण्यात आला आहे. त्यात 2690 पोलीस अधिकाऱ्यांचा आणि 28,066 पोलीस शिपायांचा समावेश आहे. जवळपास 17351 पोलीस कर्मचाऱ्यांना व्हॅक्सिनचा दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यात 1325 पोलीस अधिकारी आणि 16,026 पोलीस शिपायांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री ठाकरे आज रात्री जनतेशी साधणार संवाद, लॉकडाऊनबाबत घोषणा होण्याची शक्यता #संवाद #मुख्यमंत्री #ठाकरे #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/BP8gYKXi46
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 13, 2021