नवी दिल्ली : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर कोणतंही स्टेटस, फोटो, स्टोरी पब्लिक पोस्ट केल्यानंतर त्यावर अशा काही लोकांच्या कमेंट येतात, जे आपल्याला पसंत नसतात आणि एखाद्या कारणामुळे आपल्याला त्यांना ब्लॉकही करता येत नसतं. अशी समस्या आता फेसबुक लवकरच दूर करणार आहे.
ऑनलाईन पैसे पाठविणाऱ्यांसाठी मोठी बातमी; रविवारी RTGS सेवा 14 तासांसाठी बंद https://t.co/iLyn57Tsnp
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 13, 2021
मार्क झुकरबर्ग यांची सोशल मीडिया कंपनी फेसबुक लवकरच असं फीचर आणणार आहे, ज्यात युजरकडे असा ऑप्शन असेल, की ते आपल्या पब्लिक पोस्ट बाबत ठरवू शकतील की कोणी कमेंट करावी आणि कोणी नाही. एवढंच नाही तर फेसबुक युजर्सला फीड फिल्टर बारचा उपयोग करुन आपल्या न्यूड फीड सॉर्ट करण्याचा आणि ब्राउज करण्याचाही पर्याय मिळेल.
अँड्रॉईड स्मार्टफोन युजर्स फेसबुक App ला ओपन करुन फीड फिल्टर बारला एक्सेस करू शकतील, ज्यावेळी ते न्यूज फीड स्क्रोल करतील. परंतु आयओएस युजर्ससाठी हे फीचर सध्या उपलब्ध नाही. परंतु आयफोन युजर्ससाठी येणाऱ्या काही दिवसांत हे फीचर उपलब्ध होईल असं फेसबुककडून सांगण्यात आलं आहे.
5 वर्षाच्या मुलीने 105 मिनिटांत 36 पुस्तके वाचून केला 'विश्वविक्रम' https://t.co/S9y76jqhma
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 12, 2021
* असा करा टूलचा वापर
– टॉप राईट कॉर्नरवर drop-down मेन्यूवर क्लिक करा.
– येथे सेटिंग्ज अँड प्रायव्हसीवर जाऊन, सेटिंगवर क्लिक करा.
– त्यानंतर पब्लिक पोस्टच्या डाव्या बाजूला क्लिक करा.
– आता Who Can Follow Me वर जा आणि येथे Public सिलेक्टेड आहे का हे तपासा.
– त्यानंतर Public Post Comments वर क्लिक करा.
– येथे कोणाला कमेंट करण्यासाठी परवानगी द्यावी ते ठरवा. या सेटिंगनंतर तुम्ही परवानगी दिलेल्या लोकांनाच तुमच्या पब्लिक पोस्टवर कमेंट करता येईल.