सोलापूर : कोरोनाची साखळी खंडीत करण्याच्या हेतूने आज बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून कडक संचारबंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. या कडक संचारबंदीतही शेतमाल वाहतूक सुरु राहणार असल्याचे बाजार समितीकडून सांगितले.
या काळात घरपोच सेवा (होम डिलिव्हरी) सुरु राहणार आहे, अशी माहिती पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तर कोरोनासंबंधीचे सर्व नियम पाळून कृषी उत्पन्न बाजार समितीतील लिलाव सुरु राहतील, अशी माहिती बाजार समितीचे प्रभारी सचिव अंबादास बिराजदार यांनी दिली.
'केंद्राकडून सुरु असणाऱ्या योजनांचीच राज्य सरकारकडून पॅकेज म्हणून घोषणा' https://t.co/8xMVmA1qfV
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
पहाटे पाच ते सकाळी साडेसात-आठ वाजेपर्यंत शेतमालांचे लिलाव होतील, असेही बिराजदार यांनी स्पष्ट केले. कडक संचारबंदी काळात शेतमाल वाहतूक सुरुच राहणार असल्याने ताजा भाजीपाला शहर वासियांना मिळणार आहे.