लखनौ – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आदित्यनाथ यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे. दरम्यान सध्या ते आयसोलेशनमध्ये आहेत. तसेच आपल्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनाही कोरोना झाला आहे.
उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. याची माहिती आदित्यनाथ यांनी ट्विटरवरून दिली आहे.
आयपीएल २०२१ : रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्स विजयी, गुणतालिकेत दुसरे स्थान https://t.co/MZrGhvkSXU
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
योगी आदित्यनाथ यांन म्हटलं की, सुरुवातीची लक्षणे दिसल्यानंतर मी कोरोना चाचणी केली होती. कोरोनाचा चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे .सद्या मी सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली आणि सल्ल्याने सर्व उपचार घेत आहे. माझे सर्व नियोजित कार्यक्रम हे व्हर्च्युअल होतील असंही योगींनी म्हटलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं की, राज्य सरकारचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु आहे. अलिकडच्या काळात जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि योग्य ती खबरदारी घ्या, असं आवाहनही त्यांनी केलं.
राज्यात आज रात्री 8 वाजेपासून 144 कलम लागू, 5 हजार 400 कोटींची अशी मिळणार मदत https://t.co/4obosc3KFr
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात दैनंदित व्यवहारांवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळं येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेशातील रुग्ण संख्या आणखी झपाट्याने वाढेल, अशी शक्यता आहे. कालच्या आकडेवारीनुसार राज्यात 24 तासांत 18 हजार 021 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
पवित्र अशा रमजानचं महत्त्व काय? पवित्र रोजास प्रारंभ https://t.co/hoeSlxM6zv
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 14, 2021
राज्यातील ॲक्टिव रुग्णांची संख्या एक लाखांच्या जवळ पोहोचली आहे. सध्या राज्यात 95 हजार 980 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काल दिवसभरात 3 हजार 474 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. राज्यात लखनौमध्ये सर्वाधिक 5 हजार 382 नवे रुग्ण सापडेले आहेत. अलाहाबाद अर्थात प्रयागराज येथे 1 हजार 856 नव्या रुग्णांची नोदं झाली आहे. वाराणसीतही जवळपास दीड हजार रुग्ण एका दिवसात सापडले आहेत.