यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून रोजगार हमी आणि फळसंवर्धन मंत्री संदीपान भुमरे यांची नेमणूक करण्यात आली आहे. वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे बरेच दिवस रिक्त होते. आता संदीपान भुमरे यांची पालकमंत्री म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे. संदीपान भुमरे हे औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्याचे आमदार आहेत.
सोलापूर शहरात सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंतच अत्यावश्यक दुकाने राहणार खुले https://t.co/h1Hkn8x3AO
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021
यवतमाळ जिल्ह्याचे नवे पालकमंत्री म्हणून रोजगार हमी आणि फलसंवर्धन मंत्री संदीपान भुमरे यांची नेमणूक केलीय. वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे बरेच दिवस रिक्त होते. आता संदीपान भुमरे यांची पालकमंत्री म्हणून राज्य सरकारने नियुक्ती केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
संजय राठोड यांचे पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात नाव आल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून यवतमाळ जिल्ह्याला पालकमंत्री नव्हता. आज अखेर राज्य सरकारने संदिपान भूमरे यांच्या रुपाने जिल्ह्याला नवा पालकमंत्री दिला आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1383060182993752067?s=19
संदिपान भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. सध्या ते महाविकास आघाडी सरकारमध्ये फलोत्पादन आणि रोजगार हमी विभागाचे मंत्री आहेत.
घरातील साऱ्यांनाच कोरोना; सोलापुरातील युवा पत्रकाराची आत्महत्या https://t.co/abXiRouWPS
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 16, 2021