मुंबई : रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण पेटले आहे. त्यातच आता देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून ही तक्रार दाखल करण्यात आली. फडणवीस आणि दरेकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला. त्यांनी पोलिसांना धमकावण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना अटक करा, अशी मागणी करण्यात आली.
नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपकडून दोन ठिकाणी पोलिसात तक्रार https://t.co/Ycey0Y3fzu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
रेमडेसिविर इंजेक्शनच्या मुद्द्यावरुन रंगलेल्या राजकारणाला आता आणखीन धार चढण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईच्या विलेपार्ले पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस आणि दरेकर यांनी सरकारी कामात व्यत्यय आणला आणि पोलीस अधिकाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न केला.
दिलासादायक! वर्ध्यात सुरु होणार रेमडेसिव्हीरचे उत्पादन https://t.co/C2uajCzCaa
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
याप्रकरणी त्यांना अटक झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलचे पदाधिकारी नितीन माने यांनी केली. त्यामुळे आता भाजप पक्ष याविरोधात काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.