सोलापूर : रुग्णालयात आलेल्या कोरोना रुग्णांची माहिती दडविणा-या दोन खासगी डॉक्टरांविरुद्ध सोलापूर महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टरवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे.
मी माझ्या नवऱ्याला किस करेल, तुम्ही रोखणार का ? कर्फ्यूदरम्यान घडला प्रकार, पहा व्हायरल व्हिडिओ https://t.co/bsmGqOvrRe
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
या प्रकाराने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. डॉ. युवराज माने (रा. नवीन आरटीओ कार्यालयाजवळ, सोलापूर) व डॉ. जी. बी. विश्वासे (अक्कलकोट रोड, पाण्याची टाकी, सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावे आहेत. डॉ. युवराज माने यांचे खासगी रुग्णालय असून, येथे शांतीनगर येथे राहणा-या 84 वर्षांच्या इसमाने श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचार घेतले; परंतु त्रास कमी न झाल्याने त्या इसमाला ईएसआय हॉस्पिटल, होटगी रोड येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मात्र, सदरचा इसम हा उपचारादरम्यान मरण पावला. शवविच्छेदनात सदरचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. या रुग्णाची माहिती निर्माण क्लिनिकच्या डॉक्टरांनी त्वरित पालिकेला कळविणे आवश्यक होते; परंतु याची कुठलीच माहिती डॉ. माने यांनी रुग्णालयात ठेवली नव्हती. पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली असता, सदरचा प्रकार उघडकीस आला.
हफ्ते गृहमंत्र्यांना पोहचवावे लागतात, पाच लाखांची पीआयने केली मागणी https://t.co/2bT8SoWvVy
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
दुसरी घटना अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या डॉ. जी. बी. विश्वासे यांच्या नित्यानंद दवाखान्यात घडली आहे. या दवाखान्यात सौम्य लक्षणे व मध्यम लक्षणे असलेल्या कोणत्याही रुग्णांची माहिती व रजिस्टर ठेवली नसल्याचे आढळले. या दोन्ही घटनांची गंभीर दखल घेत आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी पालिकेच्या वतीने डॉ. युवराज माने व डॉ. जी. बी. विश्वासे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून, हलगर्जीपणा उघडकीस आला आहे.
सरकारने निर्णय घेतला मागे;आरटीपीसीआर चाचणीची सक्ती नाही https://t.co/7jvhs64Sn1
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021