मुंबई : देशात एकीकडे कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. तर दुसरीकडे राजकारण तापत आहे. यावरून अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आपला संताप व्यक्त केला. ‘सगळ्यात मोठी कीड जर आपल्या देशाला आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे राजकारण. ही कीड covid पेक्षा भयाण, घातक आणि वर्षानुवर्षे आपल्याला पोखरत जाणारी आहे. या कीडपासून बचाव करता आला तर बघा!!.. अवघड आहे सगळंच…काळजी घ्या’, अशी तिने पोस्ट केली.
सोशल मीडिया हे लोकांशी कनेक्ट होणासाठी अत्यंत तगडं माध्यम मानल जात. अशातच अनेक सेलिब्रिटी सुद्धा आपले चित्रपटाचे प्रमोशन नाहीच तर आपले व्यतिगत मत सुद्धा सोशल मीडिया द्वारे मांडतात. एखाद्या प्रसिद्ध नावाजलेला राजकारणी व्यक्ती असो, खेळाडू किंवा कलाकार असो त्याने केलेल्या एका पोस्टचा किंवा वक्तव्याचा प्रभाव तसेच चर्चा लोकांमध्ये रंगताना दिसते. नुकतच मराठमोळी सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने पोस्ट केलेल्या एका इंस्टा स्टोरी मुळे ती खूप चर्चेत आली आहे.
इस्रायलने कोरोनावर केली मात, मास्कला केले बाय – बाय, कसे ते वाचा सविस्तर, https://t.co/v4fc4e4eMK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
जगभरात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहेत तर दुसरीकडे केंद्र आणि महाराष्ट्र राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान, मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री तेजस्विनी पंडितने सध्या सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ‘देशातलं राजकारण हे काेरोनापेक्षाही भयंकर’ आहे असे तिने सोशल मीडियावर म्हटले आहे. सध्या तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
तेजस्विनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. ‘सगळ्यात मोठी कीड आपल्या देशाला, आपल्याच नाही तर सगळ्या जगाला लागली आहे, ती आहे राजकारण. ही कीड कोविडपेक्षाही भयाण, घातक आणि वर्षानुवर्ष आपल्याला पोखरत जाणारी आहे. या कीडीपासून बचाव करता आला तर बघा. अवघड आहे सगळंच… काळजी घ्या’ देशातील परिस्थिती गंभीर असताना सुरू असलेले राजकारण पाहता तेजस्विनीच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपकडून दोन ठिकाणी पोलिसात तक्रार https://t.co/Ycey0Y3fzu
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार पाहता एकीकडे अनेक लोक नियमांच उल्लंघन करत आहेत म्हणून त्यांच्या कडून दंड आकारला जात आहे. तर दुसरीकडे अनेक प्रचार सभा,भव्य निवडणूक रॅली मध्ये हेच नियम पायदळी तुडवले जात आहेत.
देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकरांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार https://t.co/z2PxV0tviA
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
इतकेच नाही तर अपुर्या ऑक्सिजनचा तुटवडा, तसेच रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्या मुळे अनेकांना आपले प्राण रस्त्यावर गमवावे लागले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रेमिडिसवीर आणि लसीकरणावरून राजकारण होत आहे. एकूणच परिस्थिति पाहता तेजस्विनी पंडित हिने पोस्ट द्वारे कडक शब्दात टीका केली आहे.
तेजस्विनी पोस्ट मध्ये लिहतेकी “सगळ्यात मोठी कीड जर आपल्या देशाला,आपल्यालाच नाही,तर सगळ्या जगाला लागली आहे,ती आहे ‘राजकारण’.’ही कीड’कोविडपेक्षा भयाण,घातक आणि वर्षानुवर्ष आपल्याला पोखरत जाणारी आहे. ‘या कीड’पासून बचाव करता आला तर बघा!..अवघड आहे सगळंच. काळजी घ्या.” अश्या परखड शब्दात तेजस्विनी ने आपले मत मांडले आहे.
तेजस्विनी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच,तसेच समाजात घडणार्या गोष्टीवर आपले मत मांडत असते.
कोरोना रुग्णांची माहिती लपवणा-या दोन खासगी डॉक्टरांवर गुन्हा दाखल https://t.co/EkbPl8zjsZ
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021