जैरुसलम : सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनारूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून ऑक्सिजन आणि बेडची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे कोरोनाची दहशत पसरली आहे. मात्र अशातच इस्रायल देशाने कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. इस्रायलने जवळपास एक वर्षभरानंतर देशभरात लागू असणाऱ्या मास्क वापरातील निर्बंधांमध्ये शिथिलता आणली आहे. इस्त्रायलने वाढत्या कोरोना लसीकरणाच्या जोरावर कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणला आहे.
कोरोनाविरोधात लढ्यासाठी आता 'ऑक्सिजन एक्स्प्रेस' धावणार https://t.co/iC5CN816js
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
जगात कोरोना महामारीचे थैमान सुरुच आहे. 2020 मध्ये अख्या जगाला वेठीस धरलेल्या कोरोना महामारीने 2021 मध्येही आपला प्रकोप सुरुच ठेवला आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली आहे. त्यामुळे लोकांना वारंवार हाथ धुणे, मास्कचा वापर करणे अशा कोरोना नियमांचे पालन करावे लागत आहे. आणखी किती काळ या महामारीच्या भीतीखाली राहावं लागेल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यातच आता इस्त्रायलमधून एक आनंदाची बातमी समजत आहे. आता सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याची आवश्यकता नसल्याची मोठी घोषणी इस्त्रायसाच्या आरोग्य विभागाने केली आहे.
A small Country Israel defeated Corona! pic.twitter.com/vGBH83y9Dt
— Girish Kumar (@gikumar111) April 19, 2021
कोरोनाचा हाहाकार केव्हा संपेल आणि आपल्याला पूर्वीसारखं आयुष्य कधी जगता येईल याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. काल रविवारी या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली असली तरीही इथं कार्यालयांमध्ये मात्र कर्मचाऱ्यांना मास्क वापरणं बंधनकारक असणार आहे. जवळपास 93 लाखांची लोकसंख्या असणाऱ्या या देशानं आतापर्यंत 50 लाखांहून अधिक जनतेला कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पण, इस्त्रायलच्या नागरिकांनी कोरोनापूर्वीसारखीचे आयुष्य जगणे सुरु केले आहे. इस्त्रायलमधील एकूण लोकसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. त्यामुळे देशात कोरोना संसर्ग पुन्हा पसरण्याचा धोका कमी झाला आहे. यापार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने लोकांवरील सार्वजनिक ठिकाणी मास्क घालण्याची सक्ती काढून टाकली आहे. त्यामुळे नागरिकांना आता सार्वजनिक ठिकाणी मास्कशिवाय फिरण्यात मुभा मिळाली आहे.
Israel has a great leader called Netanyahu – he is best efficient and a CEO of a country in the world and Israel and as rated the 5th nation in the world who successful defeated corona . . He treatedCOVID as a CEO signing many contracts creating the transfer systems
— Shoula Romano-Horing🇮🇱🇺🇸🇮🇱 (@RomanoHoring) December 29, 2020
एकेकाळी इस्त्रायलमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला होता. त्यानंतर देशात लसीकरण मोहीत हाती घेण्यात आली. बघताबघता देशात अर्ध्यापेक्षा अधिक नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. जगाच्या तुलनेत इस्त्रायलमधील लसीकरण मोहिमेची अती खूप अधिक होती. इस्त्रायलमध्ये जानेवारीच्या सुरुवातीला दिवसाला 10 हजार कोरोना रुग्ण आढळून येत होते. पण, आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून आता दिवसाला 200 रुग्ण आढळून येत आहेत.
मी माझ्या नवऱ्याला किस करेल, तुम्ही रोखणार का ? कर्फ्यूदरम्यान घडला प्रकार, पहा व्हायरल व्हिडिओ https://t.co/bsmGqOvrRe
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 19, 2021
इस्त्रायलमधील शाळा, हॉटेल, रेस्टराँ, बार सुरु करण्यात आले आहेत. मास्क घालण्याची सक्ती नसली, तरी अनेक लोक मास्क न घालण्याचा धोका पत्करायला तयार नाहीत. मास्क हा अनेकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाला आहे. इस्त्रायलमध्ये आतापर्यंत 836,000 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर 6,300 लोकांचा विषाणूने बळी घेतला आहे. आतापर्यंत देशातील 53 टक्के म्हणजे 93 लाख लोकांना कोरोना प्रतिबंध लस देण्यात आली आहे.
* लवकरच पर्यटनाला होणार सुरुवात
इस्त्रायलचे आरोग्यमंत्री युली इडेलस्टेईन यांनी दिलेल्या माहितनुसार इस्त्रायलमध्ये प्रभावीरित्या कोरोनाचं लसीकरण करण्यात आल्यामुळे कोरोनावर मात करण्यात आलीय. त्यामुळे इस्त्रायलमध्ये मास्क घालण्याचं बंधन शिथिल करण्यात आलंय.
Nearly 10,000 Patients Recovered: Israel's 'Rapid, Strict Response' Defeated Corona..
Read anything about Israel’s success in dealing with Covid 19?
Read anything about Covid 19 treatment breakthroughs?https://t.co/Sk60gwfEMp— Jacob Pape (@JacobPape4) May 5, 2020
इस्त्रायलमध्ये लवकरच पर्यटनालाही सुरुवात होणार असल्याचं सांगण्यात आलंय. सर्व जगासाठी इस्त्रायल पर्यटन सुरू करणार असून बाहेरून येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाची कोरोना चाचणी करून त्यांना देशात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. इस्त्रायलने कमी लोकसंख्या आणि उत्तम प्रशासन यामुळे हा टप्पा गाठल्याचं सांगितलं जातंय.