मुंबई : पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे,” असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी वादग्रस्त ठरलेल्या पुतण्या तन्मय फडणवीस प्रकरणावर हात वर केले आहेत.
Priority for any service should be on basis of decorum or prevalent policy. No one is above rules & law. The law can take its course and we stand for justice always ! We are with you on this issue, pls take action which will stop future queue breaking occurrences!#tanmayfadnavis https://t.co/SgLYOAMGee
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) April 20, 2021
देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षाच्या पुतण्याला लस देण्यात आल्यानं सध्या फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर मोठी टीका करण्यात आली. त्यानंतर हा फोटो डीलिटही करण्यात आला आहे.
Dear @Dev_Fadnavis, is your Nephew Tanmay Fadnavis 45+ years old?
If not, how is he eligible for taking the Vaccine?
Just like Remdesivir, are you hoarding Vaccines & giving it to your family members?
People are dying. There is Vaccine Shortage. But Fadnavis family is Safe. pic.twitter.com/6vjwIqNuEI
— Srivatsa (@srivatsayb) April 19, 2021
तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे. असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लसींचा तुटवडा असल्याने सध्या राज्य आणि केंद्र सरकारमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. लस उपलब्ध होत नसल्याने अनेक लसीकरणं केंद्र बंद ठेवण्याचे वेळ प्रशासनावर आली असताना सोमवारी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पुतण्याच्या फोटोची चर्चा रंगली होती. यामध्ये तन्मय फडणवीस लसीचा डोस घेताना दिसत आहे. सध्या देशभरात ४५ वर्षाच्या पुढील लोकांना लसीकरणासाठी परवानगी असतानाही पात्र नसणाऱ्या तन्मय फडणवीसला लस कशी काय देण्यात आली असा प्रश्न उपस्थित होऊ लागला. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी करोना लसीकरणासाठी असणाऱ्या नियमांचं पालन केलं पाहिजे याबाबत दुमत नसून कोणालाही चुकीच्या पद्धतीने ते करण्याची परवानगी देता कामा नये असं म्हटलं आहे.
अभिनेते किशोर नांदलसकर यांचे कोरोनाने निधन, 'जिस देश में गंगा रहता है' मधील सन्नाटा काळाच्या पडद्याआड https://t.co/ahTcsCoExF
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
तन्मय फडणवीसच्या फोटोवरुन झालेल्या वादावर स्पष्टीकरण देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, ”तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे”.
'देवेंद्र फडणवीसांच्या पुतण्याला लस कशी मिळाली ?, व्हायरल पोस्ट लगेच केली डिलिट https://t.co/MA2il4WWVk
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
* प्रमाणपत्र दाखवल्याने दुसरा डोस
रुग्णालयाचं स्पष्टीकरण तन्मय फडणवीसने नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. वाद झाल्यानंतर त्याने ही पोस्ट डिलीट केली. दरम्यान नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे संचालक शैलेश जोगळेकर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं आहे की, “तन्मय फडणवीसने आमच्याकडे लसीचा दुसरा डोस घेतला. मुंबईमधील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्याने पहिला डोस घेतला होता. त्याला कोणत्या निकषाद्वारे पहिला डोस देण्यात आला याची कल्पना नाही. त्याने आम्हाला प्रमाणपत्र दाखवल्यानंतर आम्ही आमच्या सेंटरमध्ये दुसरा डोस दिला”.