नाशिक : नाशिकमधील महानगरपालिकेच्या जाकीर हुसैन या रुग्णालयात ऑक्सिजन टँकमधून गळती झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. त्यानंतर मृतांचा आकडा वाढला असून 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
लॉकडाऊनबद्दल पंतप्रधान मोदींचं मोठं विधान #surajyadigital #सुराज्यडिजिटल #PMOIndia #lockdown2021 #लॉकडाऊन #NarendraModi #नरेंद्रमोदी #statement #विधानhttps://t.co/niH6vlqf5u
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना घडली आहे. यात व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृतकांची संख्या वाढून 22 झाल्याची माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली. दरम्यान, तांत्रिक कारणाने ऑक्सीजनच्या टाकीला गळती लागल्याचे सांगितले जातंय.
राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवाना धारकांना अनुदान मिळणार https://t.co/h6iK9Kc3qh
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
शहर परिसरामध्ये मागील आठवडाभरापासून छातीत वेदना, श्वासोच्छ्वास त्रास आणि चक्कर येऊन मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. सोमवारी शहराच्या विविध भागांत अशा प्रकारे 11 लोक दगावल्याची अकस्मात नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अचानकपणे अशा प्रकारे नागरिकांचा राहत्या घरी मृत्यू होत असल्याने प्रशासकीय यंत्रणाही बुचकळ्यात पडली आहे. 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.
प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात 'राम' येवो -श्री रामनवमीच्या शुभेच्छा….#रामनवमी #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Shri #RamaNavami2021 pic.twitter.com/bvpsQN4fgM
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
आशाबाई बनसोडे (५५,रा.सातपूर), रमेश चन्ना (६६,अशोकामार्ग), सुरेखा केंद्रे (५८,रा.गोविंदनगर), सुधाकर जठार (७०,रा. कामटवाडे), विलास बारगळ (५२,रा. सिन्नरफाटा), कचरू माळी (७८,रा. नाशिक रोड), सिकंदर सय्यद (६०, रा.नाशिक), वत्साबाई नरवडे (८१, रा.शिवाजीनगर, धर्माजी कॉलनी), विमलबाई महाले (७९,पेठ रोड), ज्योती गायकवाड (४७, गंजमाळ) यांच्यासह एका अनोळखी पुरुषाचा वरील कारणांनी मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.
चक्कर येणे किंवा तत्सम प्रकाराने मृत्यू झाल्याची स्वतंत्र नोंद नसते. संबंधित डॉक्टरांनी काय दाखला दिला. त्यात ते स्पष्ट होऊ शकते, कारण चक्कर येऊन पडणे आणि मृत्यू हे हजार आजारांचे लक्षण आहे, असे महापालिकेचे कोविड सेलचे प्रमुख डॉ. आवेश पलोड यांनी सांगितले.
भारताकडून 9 हजार 294 मेट्रीक टन अॉक्सिजनची निर्यात #oxygen #india #surajyadigital #सुराज्यडिजिटल #अॉक्सिजन pic.twitter.com/VC45W3Cve1
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत 11 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरु आहे.
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. या रुग्णालयात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 11 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
लॉकडाऊनबद्दल पंतप्रधान मोदींचं मोठं विधान, आजपर्यंत 12 कोटी लोकांचं लसीकरण झालं! 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वाचं लसीकरण https://t.co/d15997MJrw
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात जवळपास 131 रुग्ण ऑक्सिजनवर आहे. सध्या या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झालं आहे. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.
नवी नियमावली, सकाळी 7 ते 11 पर्यंतच दुकानं सुरु राहणार https://t.co/ZiOhLbNpXM
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
दरम्यान ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
“स्थानिक प्रशासनाने कळवलं की, नाशिकमध्ये आलेल्या टँकरमधील वॉल्वमध्ये लीकेज असल्याने ऑक्सिजन वाया गेला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण माहिती घेऊन परिपत्रक जारी केलं जाईल”
राजेश टोपे – आरोग्य मंत्री