मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यात संचारबंदी जाहीर केली तेव्हा राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांसाठी 1500 रुपये अनुदान जाहीर केले होते. याबाबत परिवहन मंत्री अनिल परब आणि मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. राज्यात 7 लाख 15 हजार रिक्षा परवाना धारक असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये अनुदान देण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे. अनुदान बँक खात्यांवर जमा होईल.
प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात 'राम' येवो -श्री रामनवमीच्या शुभेच्छा….#रामनवमी #surajyadigital #सुराज्यडिजिटल #Shri #RamaNavami2021 pic.twitter.com/bvpsQN4fgM
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 21, 2021
राज्यातील करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्यानुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे सोबत मंत्रालयात बैठक संपन्न झाली.
अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन #surajyadigital #हिना #heenakhan #हिनाखान #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/0iVFK1nyOK
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदी जाहीर केली तेव्हा विविध घटकांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्यामध्ये राज्यातील परवानाधारक रिक्षा चालकांसाठी 1500 रुपये अनुदान देण्याचं जाहीर केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संचारबंदी लावताना राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं.
मुंबई : राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारकांना मिळणार अनुदान #auto #rekasha #grand #अनुदान #रिक्षा #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/eclyjqSo7W
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवाना धारक असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यांवर थेट ऑनलाईन पध्दतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नवी नियमावली, सकाळी 7 ते 11 पर्यंतच दुकानं सुरु राहणार https://t.co/ZiOhLbNpXM
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 20, 2021
रिक्षा परवाना धारकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याकरतापरिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहे . त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल. कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये सदर रक्कम ऑनलाईन पध्दतीने जमा करण्यात येणार आहे.