चेन्नई : आयपीएल 2021 मध्ये आज सनरायझर्स हैदराबादनं पंजाबचा 9 विकेट्सनी पराभव केला आहे. किंग्स पंजाबनं प्रथम फलंदाजी करताना 120 धावा केल्या होत्या. हैदराबादनं 121 धावांचं आव्हान 18.4 षटकात पूर्ण केलं. हैदराबाद कडून जॉनी बेयरस्टॉनं सर्वाधिक 63 धावा केल्या. तसेच, डेव्हिड वॉर्नरनं 37 केल्या तर केन विल्यमसन 16 धावांवर नाबाद राहिला. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा हा यंदाच्या IPL मधील पहिला विजय आहे.
सलग तीन पराभवांनंतर अखेर सनरायजर्स हैदराबादला यंदाच्या आयपीएल मोसमात आपले विजयाचे खाते उघडण्यात यश आले. आज दुपारी झालेल्या सामन्यात हैदराबादने पंजाब किंग्स संघावर ९ विकेट राखून मात केली. या सामन्यात पंजाबचा डाव अवघ्या १२० धावांतच आटोपला आणि हैदराबादने हे लक्ष्य ९ विकेट आणि ८ चेंडू राखून गाठले. सलामीवीर जॉनी बेअरस्टोने हैदराबादकडून अप्रतिम फलंदाजी करताना ५६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने नाबाद ६३ धावांची खेळी केली. त्याला कर्णधार डेविड वॉर्नर (३७) आणि केन विल्यमसन (नाबाद १६) यांची उत्तम साथ लाभली.
#PBKS have won the toss and will bat first against #SRH.
Follow the game here – https://t.co/PsUV2KPwvf #VIVOIPL pic.twitter.com/qBVvr4n7wB
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021
त्याआधी या सामन्यात पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. पंजाबने सुरुवातीपासूनच ठराविक अंतराने विकेट गमावल्या. राहुल केवळ ४ धावा करून बाद झाला. मयांक अगरवाल (२२) आणि क्रिस (१५) यांनी पंजाबचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे दोघे बाद झाल्यावर शाहरुख खान (२२) वगळता पंजाबच्या इतर फलंदाजांना फार काळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्यामुळे त्यांचा डाव १२० धावांवर आटोपला. हैदराबादकडून खलील अहमदने तीन, तर अभिषेक शर्माने दोन विकेट घेतल्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
या सामन्यापूर्वी उभय संघांच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक झाली असून नाणेफेकीचा कौल पंजाब संघाच्या बाजूने लागला. त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
Or is it this ridiculous cut-pull combination, again from @Gmaxi_32? 🤯 pic.twitter.com/QPj6SSt9Lm
— ICC (@ICC) April 21, 2021
याबरोबर पंजाब आणि हैदराबाद संघाने अंतिम ११ जणांचे संघही जाहीर केले. हैदराबाद संघात मनिष पांडेला डच्चू देत सिद्धार्थ कौलला स्थान देण्यात आले. याबरोबरच अब्दुल समदच्या जागी केदार जाधवला संधी देण्यात आली. एवढेच नव्हे तर, दुखापतीतून सावरलेला केन विलियम्सन याचेही संघात पुनरागमन झाले.
That's that from Match 14 as @SunRisers win by 9 wickets to register their first win in #VIVOIPL 2021.
Scorecard – https://t.co/gUuead0Gbx #PBKSvSRH pic.twitter.com/d91pWM2OHR
— IndianPremierLeague (@IPL) April 21, 2021
दुसरीकडे पंजाब संघात ३ बदल करण्यात आले. झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ आणि जलज सक्सेना यांना बाहेर करत फिन ऍलेन मोसेस हेन्रिक्स आणि मुर्गन अश्विनला सहभागी करण्यात आले.
* असे आहेत ११ जणांचे संघ
पंजाब किंग्ज- केएल राहुल (कर्णधार), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, मोइसेस हेनरिक्स, निकोलस पूरन, दीपक हूडा, शाहरुख खान, फॅबियन ऍलेन, मुरुगन अश्विन, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
सनरायझर्स हैदराबाद – डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, केन विल्यमसन, विराट सिंग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, रशीद खान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, सिद्धार्थ कौल