कोलकाता : देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीतील उर्वरित टप्प्यांसाठी काढल्या जाणाऱ्या रोड शो, पदयात्रा, सायकल, मोटारसायकल, वाहन रॅली यांच्यावर बंदी घातली आहे. याशिवाय प्रचार सभेत 500 पेक्षा जास्त लोकांचा समावेश नसावा, असेही आदेश आयोगाने दिले आहेत. दरम्यान बंगालमध्ये गुरुवारी सहाव्या टप्प्यातील मतदान झाले.
विरारमधील रूग्णालयाला आग; मृतांचा आकडा 13 वर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता https://t.co/zYuCLhYDnb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
कोरोना महामारीच्या वाढलेल्या प्रादुर्भावामुळे निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालमध्ये रोड शो करणाऱ्या राजकीय पक्षांना बंदी घातली आहे. एवढेच नव्हे तर यापुढे 500 हून अधिक जण जाहीर सभांना उपस्थित राहू शकणार नाहीत. यापूर्व कोलकाता हायकोर्टाने कोरोना प्रोटोकॉलबाबत निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली होती.
महाराष्ट्रात प्रवासासाठी लागणार ई-पास, वाचा सविस्तर बातमी https://t.co/LwenMMgTNj
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
सरन्यायाधीश टीबीएन राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तीन जनहित याचिकांवर सुनावणी करताना म्हटले की, कोरोना सुरक्षेबाबत परिपत्रके देणे आणि बैठका घेणे पुरेसे नाही. यानंतर निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना रोड शोला बंदी घालत सभांसाठी उपस्थितीची संख्या निश्चित केली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीमुळे आपला नियोजित बंगाल दौरा रद्द केला आहे. पंतप्रधान मोदींच्या चार सभा शुक्रवारी होणार होत्या. त्या सभांची तयारीही पूर्ण झाली होती. परंतु देशातील कारोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी बंगालमध्ये न जाता दिल्लीत उच्चस्तरीय बैठका घेणार आहेत.
सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी, दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली https://t.co/5a25AgSwdd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
दुसरीकडे, निवडणूक आयोगाने सभांवर निर्बंधांसह रोड शोवर बंदी घातल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही आपल्या निवडणूक सभा व रोड शो रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, बंगालमध्ये आता पंतप्रधान मोदींच्या मोठ्या सभा होणार नाहीत. तसेच मोदी काही छोट्या सभा करतील. या सभांना 500 च्या वर लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी नसेल, असा निर्णय भाजपने घेतला होता. याशिवाय, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनीही पंतप्रधान मोदींसह सर्व नेत्यांच्या बंगालमध्ये छोट्याच सभा केल्या जातील, असा निर्णय घेतला होता.
पंतप्रधान – मुख्यमंत्री बैठकीत नरेंद्र मोदी यांनी केजरीवालांना भर सभेत सुनावले, सोशल मीडियावर व्हायरल #सुराज्यडिजिटल #PMOIndia #CM #Meeting #NarendraModi #surajyadigital #ArvindKejriwal #अरविंदकेजरीवालhttps://t.co/EB6o4IJjhG
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे एका दिवसात 11,948 रुग्ण आढळले आहेत. यादरम्यान 56 रुग्णांचा मृत्यू झाला. पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यांत मतदान होत आहे. यापैकी सहा टप्प्यांतील मतदान झाले आहे. आज सहाव्या टप्प्यात 43 विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान पार पडले. सातव्या टप्प्यात 36 जागांवर 26 एप्रिल रोजी मतदान होईल. याशिवाय 35 जागांवर 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी 2 मे रोजी होणार आहे.