पाटणा : पाटणा दानापूरच्या पीपापूल भागात मोठा अपघात घडला. प्रवाशांनी भरलेली एक जीप पुलावरून थेट गंगा नदीत कोसळली. या जीपमध्ये एकूण 20 प्रवाशी होते. यातील 9 जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बाकी लोकांचा शोध घेतला जात आहे. एनडीआरएफच्या रेस्क्यू टीमनं गंगेत बुडालेली गाडी बाहेर काढली आहे. दरम्यान, एका लग्न समारंभाहून परतत असताना गाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि पुलाची रेलिंग तोडून गाडी नदीत कोसळली.
सुमित्रा महाजन यांच्या निधनाची खोटी बातमी, दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली https://t.co/5a25AgSwdd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
मृतांमध्ये 75 वर्षीय रमाकांत सिंह, 60 वर्षीय गीता देवी, 50 वर्षीय अरविंद सिंह, 65 वर्षीय सरोजा देवी, 8 वर्षीय आशीष, 75 वर्षीय अनुराधा देवी, 12 वर्षीय एक मुलगा आणि 14 वर्षीय एका मुलीचा समावेश आहे. घटनास्थळी लोकांची प्रचंड गर्दी झाली आहे. वेगाने बचावकार्य सुरू आहे. याठिकाणी याआधीही अनेकदा दुर्घटना घडल्याची माहिती मिळत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
विरारमधील रूग्णालयाला आग; मृतांचा आकडा 13 वर, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता https://t.co/zYuCLhYDnb
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
जीपमधून प्रवास करत असलेले बहुतांश प्रवासी अकिलपूरचे रहिवासी असल्याचं समजतंय. एका लग्न समारंभाहून परतत असताना गाडीच्या चालकाचा ताबा सुटला आणि पुलाची रेलिंग तोडून गाडी नदीत कोसळली. गाडीच्या टपावर बसलेल्या प्रवाशांनी मात्र वेळीच सावध होत आपले प्राण वाचवले मात्र जीपच्या आत बसलेल्या लोकांना गंगेत समाधी मिळाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
Bihar: A jeep, carrying at least 15 passengers, fell into river Ganga at Peepapul in Patna today; at least 10 people missing. Search operation for the missing peole is underway. pic.twitter.com/wObcjXFYQM
— ANI (@ANI) April 23, 2021
बिहारची राजधानी पटणा येथे 15 प्रवाशांनी खच्चून भरलेली जीप गंगा नदीत कोसळल्याने 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर इतर 5 प्रवाशांना शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू झालं आहे. तसेच मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. या घटनेमुळे गंगा नदी परिसरात एकच गर्दी झाली असून परिसरात प्रचंड आक्रोश आणि रडारड सुरू झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची 'रोड शो' वर बंदी https://t.co/4hjHJdGRCd
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021
15 प्रवाशांनी खच्चून भरलेली ही जीप पीपापूल येथे अचानक गंगा नदीत कोसळली. त्यामुळे दहा प्रवाशांना नदीत जलसमाधी मिळाली आहे. यातील काही प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून इतर प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच जीपमधील पाच प्रवासी बेपत्ता असून या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे.
पंतप्रधान – मुख्यमंत्री बैठकीत नरेंद्र मोदी यांनी केजरीवालांना भर सभेत सुनावले, सोशल मीडियावर व्हायरल #सुराज्यडिजिटल #PMOIndia #CM #Meeting #NarendraModi #surajyadigital #ArvindKejriwal #अरविंदकेजरीवालhttps://t.co/EB6o4IJjhG
— Surajya Digital (@SurajyaDigital) April 23, 2021